Oscar 2023: ऑस्कर पुरस्कार नामांकन मिळालेले हे चित्रपट आजच पाहा 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर

Oscars 2023 Movies On OTT: ऑस्कर 2023 मध्ये जर कोणत्या चित्रपटाला नॉमिनेशन मिळाले आहे तर ते कोणत्या कारणासाठी आणि त्यात असं काय आहे की त्या चित्रपटाला नॉमिनेशन मिळाले आहे? असा प्रश्न जर तुम्हाला देखील आला असेल तर ऑस्कर प्रदर्शित होण्याआधी तुम्ही ते चित्रपट घरी बसल्या तुमच्या टिव्हीवर किंवा मोबाईलवर पाहू शकता. चला तर जाणून घेऊया कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर...  

Mar 12, 2023, 12:48 PM IST

Oscars 2023 Movies On OTT: ऑस्कर 2023 आपल्या सगळ्यांना लवकरच पाहता येणार आहे. ऑस्कर 12 मार्च रोजी पाहता येणार आहे. तर भारतात 13 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता प्रदर्शित होणार आहे. ऑस्कर प्रदर्शित होण्याआधी यंदाच्यावेळी ज्या चित्रपटांना नॉमिनेशन मिळाले आहे. ते चित्रपट आजच तुम्ही पाहू शकता. ते कोणत्या कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्याला पाहता येतील हे आज आपण जाणून घेणार आहोत. 

1/10

All That Breathes

All That Breathes: 'ऑल दॅट ब्रीद्स' या भारतीय चित्रपटाला नॉमिनेशन मिळाले आहे. हा चित्रपट तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 

2/10

The Elephant whisperers

The Elephant whisperers: हत्ती कसे असतात? ते धोकादायक असतात का? असा प्रश्न असेल तर हत्तीच्या आयुष्यावर असलेली ही डॉक्युमेंट्री तुम्ही पाहू शकता. या चित्रपटाला शॉर्ट फिल्म डॉक्युमेंट्री या कॅटेगरीत नॉमिनेशन मिळाले आहे. ही डॉक्युमेंट्री तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 

3/10

Avatar The Way Of Water

Avatar The Way Of Water: ‘अवतार द वे ऑफ All Quiet on the Western Frontवाटर’ हा चित्रपट अवतार या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. हा चित्रपट गेल्या वर्षीच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित होताच चित्रपटानं अनेक रेकॉर्ड मोडले होते. हा चित्रपट 28 मार्च रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.   

4/10

All Quiet on the Western Front

All Quiet on the Western Front : ‘ऑल क्वायट ऑन द वेस्टर्न फ्रंट’ हा जर्मनी चित्रपट आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. 

5/10

Elvis

Elvis: हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राइमवर पाहू शकतात. हा एक हॉलिवूड चित्रपट आहे. 

6/10

Black Panther Wakanda Forever

Black Panther Wakanda Forever: 'ब्लॅक पॅन्थर' हा चित्रपट तर प्रत्येकाला लक्षातच आहे. इतकंच काय तर या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा दिवंगत अभिनेता चॅडविक बोसमन तर आपल्या सगळ्यांच्या लक्षातच आहे. तर 'ब्लॅक पॅन्थर वकांडा फॉरेव्हर' हा चित्रपट 2018 साली प्रदर्शित झालेल्या 'ब्लॅक पॅन्थर' या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. हा चित्रपट तुम्हाला डिज्नी प्लस हॉटस्टार पाहता येणार आहे.

7/10

Argentina 1985

Argentina 1985: ‘अर्जेंटीना 1985’ या चित्रपटाला इंटरनॅशन्ल फीचर फिल्म कॅटेरगीमध्ये नॉमिनेशन मिळाले आहे. हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 

8/10

Top Gun Maverick

Top Gun Maverick: ‘टॉप गन मेवरिक’ हा एक अॅक्शन पट आहे. हा चित्रपट तुम्ही अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 

9/10

Turning Red

Turning Red: ‘टर्निंग रेड’ या चित्रपटाला बेस्ट अॅनिमेशनसाठी नॉमिनेशन मिळाले आहे. हा चित्रपट तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 

10/10

The Banshees Of Inisherin

The Banshees Of Inisherin: ‘द बंशीज ऑफ इनिशेरिन’ हा चित्रपट यूकेवर आधारित आहे. हा चित्रपट तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.  (All Photo Credit : Wikipedia) हेही वाचा : Oscar 2023 'नाटू नाटू' गाण्यावर राम चरण आणि ज्युनियर एनटीआर नाही तर 'ही' अभिनेत्री करणार डान्स