लग्नाआधी शाहिद कपूरने 'या' 10 अभिनेत्रींना दिला धोका

बॉलिवूड स्टार शाहिद कपूर च्या लव्ह लाईफशी संबंधीय याच त्या अभिनेत्री आहेत ज्यांची कधीही चर्चा होत नाही.  

Jul 07, 2022, 16:09 PM IST

Mira Rajput Shahid Kapoor Marriage Anniversary Special : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूर आज त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतोय. मीरावर त्याचं कितीही प्रेम असलं तरीही त्याच्या आयुष्यात असणारी ती एकमेव महिला नव्हती. त्याचं मीरा राजपूतशी लग्न होण्याआधी या अभिनेत्रींना आणि या एका खेळाडूचाही विश्वासघात केला आहे. नेमक्या कोण आहेत त्या ? पाहूया...

1/11

ऋषिता भट्ट (Hrishitaa Bhatt)

शाहिद कपूर बॉलिवूडचा फेमस स्टार होण्याआधी 'आंखों में तेरा ही चेहरा' या चित्रपटामध्ये त्याची कोस्टार ऋषिता भट्टसोबत त्याचं अफेअर होतं.

2/11

अमृता राव (Amrita Rao)

विवाह चित्रपटात शाहिदसोबत दिसलेली अमृता राव हिलाही त्यानं डेट केलं होतं.

3/11

करीना कपूर (Kareena Kapoor)

शाहिद आणि करीना कपूर यांच्या लव्ह लाईफची जोरात चर्चा झाली होती. हे दोघे 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते आणि नंतर त्यांच ब्रेकअप झालं.

4/11

सानिया मिर्झा (Sania Mirza)

भारतीय टेनिस खेळाडू सानिया मिर्झाचं नावसुद्धा शाहिद कपूर सोबत जोडलं जात होतं. असं असलं तरी, सानियाने या अफवांना कधीच दुजोरा दिला नाही.

5/11

विद्या बालन (Vidya Balan)

'किस्मत कनेक्शन' या चित्रपटात शाहिद कपूरसोबत दिसलेली विद्या बालनही म्हणे त्याच्या प्रेमात होती. चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी त्यांच्या अफेअसच्या बातम्या आल्या होत्या.

6/11

प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra)

प्रियंका चोप्रा आणि शाहिद कपूर यांच्या अफेअरची सुरुवात ‘कमीने’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या दोघांनी कधीही त्यांच्या नात्यांचा स्वीकार केला नसला तरी ते एकमेकांना डेट करत होते.  

7/11

सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha)

‘आर राजकुमार’ च्या सेटवर सुरु झालेली शाहिद आणि सोनाक्षीची प्यार वाली लव्ह स्टोरी फार काळ टिकली नाही. कालांतराने त्यांच नातं संपुष्टात आलं.

8/11

अनुष्का शर्मा (Anushka Sharma)

विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माचं देखील नाव शाहिद कपूरसोबत जोडलं जातं होतं. यांच्या अफेअरच्या बातम्या अनेकदा आल्या आहेत.

9/11

बिपाशा बासू (Bipasha Basu)

बिपाशा बासू आणि शाहिद कपूर यांनी ‘शिखर’ या चित्रपटात सोबत काम केलं आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्याान हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेकदा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

10/11

नर्गिस फाखरी (Nargis Fakhri)

शाहिद कपूर आणि रगिस फाखरी यांच्या रिलेशनशिपच्या अनेकदा चर्चा समोर आल्या होत्या.

11/11

शाहिद कपूर आणि मीरा राजपूत हे दोघे 2015 ला लग्नबंधनात अडकले.