तुमच्या मुलाला शाळेत येतायत अडचणी? 'या' 5 लक्षणांकडे पालकांनी अजिबात दुर्लक्ष करु नका

जेव्हा मूल हळूहळू मोठे होऊ लागते आणि शाळेत जाण्याच्या वयात पोहोचते तेव्हा पालकांसाठी हा काळ खूप कठीण जातो. मूल शाळेत जायला घाबरते त्यापेक्षा सुरुवातीला पालकांना आपल्या मुलापासून दूर जाण्याची भीती वाटते. पण हळूहळू मुलांना शाळेत जाण्याची सवय लागते आणि पालकांनाही त्याची सवय होते. 

| Jul 22, 2023, 12:06 PM IST

Kid Having Problem In School:जेव्हा मूल हळूहळू मोठे होऊ लागते आणि शाळेत जाण्याच्या वयात पोहोचते तेव्हा पालकांसाठी हा काळ खूप कठीण जातो. मूल शाळेत जायला घाबरते त्यापेक्षा सुरुवातीला पालकांना आपल्या मुलापासून दूर जाण्याची भीती वाटते. पण हळूहळू मुलांना शाळेत जाण्याची सवय लागते आणि पालकांनाही त्याची सवय होते. 

1/7

तुमच्या मुलाला शाळेत येतायत अडचणी? 'या' 5 लक्षणांकडे पालकांनी अजिबात दुर्लक्ष करु नका

Parenting Tips child facing any problem in school These 5 symptoms never ignore

Kid Having Problem In School:जेव्हा मूल हळूहळू मोठे होऊ लागते आणि शाळेत जाण्याच्या वयात पोहोचते तेव्हा पालकांसाठी हा काळ खूप कठीण जातो. मूल शाळेत जायला घाबरते त्यापेक्षा सुरुवातीला पालकांना आपल्या मुलापासून दूर जाण्याची भीती वाटते. पण हळूहळू मुलांना शाळेत जाण्याची सवय लागते आणि पालकांनाही त्याची सवय होते. 

2/7

मुलाच्या समस्या जाणून घ्या

Parenting Tips child facing any problem in school These 5 symptoms never ignore

पण तरीही काही मुलांना शाळेत जाण्याची सवय न लागल्याने ते शाळेत जाण्यास टाळाटाळ करतात, असे दिसून येते. तथापि, भारतातील बहुतेक पालक याला मुलांचा हट्ट समजतात. वास्तविक, काही मुलांना शाळेत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शाळेत जाण्यास नकार देण्याव्यतिरिक्त, जर मुलांमध्ये खालील लक्षणे दिसत असतील तर आपण शाळेत जाऊन मुलाच्या समस्या जाणून घ्यायला हव्यात.

3/7

गृहपाठ करण्यासाठी जास्त वेळ घेणे

Parenting Tips child facing any problem in school These 5 symptoms never ignore

जर तुमच्या मुलाला गृहपाठ करण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असेल तर, त्याला शाळेचे काम करण्यात अडचण येण्याची शक्यता असू शकते. हे डिस्लेक्सियासारख्या आजाराचे लक्षण देखील असू शकते, ज्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

4/7

शाळेत मित्र बनवणे कठीण

Parenting Tips child facing any problem in school These 5 symptoms never ignore

मुलांनी शाळेत मित्र बनवल्याशिवाय त्यांना तिथे जाऊसे वाटणार नाही. जेव्हा शाळेत मित्र बनू लागतात, तेव्हा ते स्वतःच सकाळी शाळेत जाण्यास उत्सुक होतात. मात्र, जर मित्र बनवले जात नसतील तर मुलाला शाळेत जाणे हा एक प्रकारचा त्रास वाटू शकतो.

5/7

सुट्टीत उत्साही आणि आनंदी

Parenting Tips child facing any problem in school These 5 symptoms never ignore

जर तुमचा मुलगा शाळेत शांत असेल आणि आठवड्याच्या शेवटी आनंदी असेल, तर याकडेही लक्ष द्या. मुलाला शाळेत काही समस्या येत आहेत, असेही यामागचे कारण असू शकते. अशा स्थितीत मूल शाळेतून आल्यावरच गप्प बसते किंवा संध्याकाळी घर शांत राहते.

6/7

खोल विचार करणे

Parenting Tips child facing any problem in school These 5 symptoms never ignore

जर मुल वारंवार एकाच जागी बसून खोल विचारात पडत असेल तर त्यांच्या मनात काहीतरी असू शकते जे त्याला आतून त्रास देत असेल. अशावेळी, मुलाशी मैत्रीपूर्ण राहून त्यांना याबद्दल विचारले पाहिजे. मुलाशी संवादासाठी मैत्रीपूर्ण नाते असणे महत्वाचे आहे.

7/7

शिक्षकांकडून वाईट फीडबॅक

Parenting Tips child facing any problem in school These 5 symptoms never ignore

पालक-शिक्षक बैठकीदरम्यान शिक्षक जर मुलाबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया देत असतील, तर ती चिंतेची बाब आहे. यानंतर मुलाकडूनही फीडबॅक घ्या. त्याला येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या समस्या सोडवून परिस्थिती बर्‍याच प्रमाणात सुधारली जाऊ शकते.