Parenting Tips: घरी लहान मुलांसमोर चुकूनही शेअर करु नका 'या' गोष्टी

लहान मुले आपल्या आईवडिलांचे अनुकरण करीत असतात. त्यामुळे पालकांनी घरी आपला वावर योग्य ठेवणे आवश्यक आहे. अनेकवेळा जाणूनबुजून किंवा नकळत पालक अशा गोष्टी मुलांना सांगतात, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या कोमल मनावर होतो. परिणामी, आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींशी लढण्याऐवजी मूल घाबरून त्यांच्यापासून दूर पळू लागते.

| Jul 06, 2023, 14:01 PM IST

Parenting Tips: लहान मुले आपल्या आईवडिलांचे अनुकरण करीत असतात. त्यामुळे पालकांनी घरी आपला वावर योग्य ठेवणे आवश्यक आहे. अनेकवेळा जाणूनबुजून किंवा नकळत पालक अशा गोष्टी मुलांना सांगतात, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या कोमल मनावर होतो. परिणामी, आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींशी लढण्याऐवजी मूल घाबरून त्यांच्यापासून दूर पळू लागते.

1/6

Parenting Tips: घरी लहान मुलांसमोर चुकूनही शेअर करु नका 'या' गोष्टी

Parenting Tips Do not share these things in front of children at home

Parenting Tips: लहान मुले आपल्या आईवडिलांचे अनुकरण करीत असतात. त्यामुळे पालकांनी घरी आपला वावर योग्य ठेवणे आवश्यक आहे. अनेकवेळा जाणूनबुजून किंवा नकळत पालक अशा गोष्टी मुलांना सांगतात, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या कोमल मनावर होतो. परिणामी, आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींशी लढण्याऐवजी मूल घाबरून त्यांच्यापासून दूर पळू लागते.

2/6

मुलाच्या प्रगतीत अडथळा

Parenting Tips Do not share these things in front of children at home

कोणतेही पालक आपल्या मुलांबद्दल चुकीचा विचार का करतील? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण काही वेळा पालकांना आवडणाऱ्या गोष्टी मुलाच्या प्रगतीत अडथळा ठरू शकतात. पालकांनी आपल्या मुलांना कोणत्या गोष्टी सांगू नयेत, याची माहिती घेऊया.   

3/6

हे खूप सोपे आहे

Parenting Tips Do not share these things in front of children at home

अनेकदा, पालक आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी कठीण गोष्ट खूप सोपी असल्याचे सांगतात.  पण असे केल्याने मुलाला एखाद्या प्रसंगाला सामोरे जाताना अडचण देखील येऊ शकते, याकडे तुम्ही दुर्लक्ष करीत असता. हे काम सोपे आहे असे म्हणण्यापेक्षा, हे काम कठीण असू शकते पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू ते पूर्ण करशील, असे म्हणू शकता.  

4/6

तू ठीक आहेस ना?

Parenting Tips Do not share these things in front of children at home

खेळता खेळता मुल पडते आणि त्याला काहीतरी लागून दुखापत होते. अशावेळी त्याला खंबीर ठेवण्यासाठी अनेक पालक मुलाला आमचा मुलगा शूर आहे, बेटा, तू ठीक आहेस, असे सांगत राहतात. पण हे करू नका. तुमच्या मुलाची जखम पाहून त्यांच्या भावना समजून घ्या आणि त्यांना बरं वाटतंय का ते विचारा.

5/6

कमकुवत बनवू नका

Parenting Tips Do not share these things in front of children at home

अमुक एक गोष्ट तुमच्यासाठी सुरक्षित नाही, असे पालक मुलांना सांगतात. पण कालांतराने मुलांना अनेक गोष्टी असुरक्षित वाटू लागते. अशा परिस्थितीत, जर तुमचा मुलगा स्लाईडवर चढण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याला अडथळा आणण्याऐवजी त्याला तसे करू द्या, जर तो पडू लागला तर त्याला पकडण्यासाठी तयार रहा. पण त्यांना जोखीम घेण्यापासून रोखू नका. असे केल्याने तुम्ही त्यांना कमकुवत बनवाल.

6/6

मुलांना त्यांचा संघर्ष करु द्या

Parenting Tips Do not share these things in front of children at home

अनेक वेळा आपल्या पाल्याला चिंतेत पाहून आई वडिल त्याची खूप विचारपूस करतात. अगदी गृहपाठ जरी जास्त असला तरीही पालक अस्वस्थ होतात. अशावेळी अनेक पालक हस्तक्षेप करून मुलांची धडपड कमी करून त्यांना मदत करतात.पण हे करू नका. मुलांना त्यांचे काम स्वत: करु द्या. तुम्ही सतत मुलांच्या कामात हस्तक्षेप केल्यास मुलाच्या आत्मविश्वासाला ठेच पोहोचेल आणि तो नेहमी कोणाची ना कोणाची मदत घेत राहिल.