शेतकऱ्याच्या लेकानं पॅरिसमध्ये फडकवला तिरंगा! कोण आहे मनू भाकेरसोबत कांस्य पदक मिळवणारा सरबज्योत सिंग?

| Jul 30, 2024, 14:20 PM IST
1/9

शेतकऱ्याच्या लेकानं पॅरिसमध्ये फडकवला तिरंगा! कोण आहे मनू भाकेरसोबत कांस्य पदक मिळवणारा सरबज्योत सिंग?

Paris Olympic 2024 Sarabajot Singh won bronze medal with Manu Bhaker

पॅरिस ऑलम्पिकमध्ये भारताला आणखी एक मेडल मिळालंय. 10 मीटर एअर पिस्टल मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये मनू भाकेर आणि सरबजीत सिंग यांनी देशाला कांस्य पदर मिळवून दिलं. 

2/9

कांस्य पदक

Paris Olympic 2024 Sarabajot Singh won bronze medal with Manu Bhaker

10 मीटर रायफलमध्ये कांस्य पदक मिळाल्यानंतर देशभरातून मनू भाकेरवर कौतुकाचा वर्षाव होतोय. तिचे शिक्षण, ट्रेनिंग, डाएट अशा सर्वाबद्दल सर्वांनी माहिती घेतली. 

3/9

सरबज्योत सिंग कोण?

Paris Olympic 2024 Sarabajot Singh won bronze medal with Manu Bhaker

दरम्यान भारताला आणखी एक विजेता गवसलाय. सरबजीत सिंग असे त्याचे नाव असून मनू आणि सरबज्योत सिंग दोघांनी 10 मीटर मिक्स्ड पिस्टलमध्ये देशाला कास्य पदक मिळवून दिले. सरबज्योतने विनिंग शॉट लगावला. दरम्यान सरबजीत सिंग कोण आहे? याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. 

4/9

शेतकऱ्याचा मुलगा

Paris Olympic 2024 Sarabajot Singh won bronze medal with Manu Bhaker

सरबज्योत सिंगचा जन्म अंबाराच्या बराडामध्ये झाला. तो केवळ 22 वर्षांचा आहे. सरबजीतचे वडील जतिंदर सिंग शेतकरी आहेत. त्यांची आई हरदीप गृहीणी आहेत.

5/9

ट्रेनिंगसाठी दिल्लीला

Paris Olympic 2024 Sarabajot Singh won bronze medal with Manu Bhaker

सरबज्योत सिंगचा जन्म छोट्याशा गावात झाला. असे असले तरी त्याच्या आईवडिलांनी त्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. सरबजीतला ट्रेनिंगसाठी दिल्लीमध्ये पाठवण्यात आले.

6/9

अभिषेक राणा कोच

Paris Olympic 2024 Sarabajot Singh won bronze medal with Manu Bhaker

सरबज्योतने आपल्या शूटिंगची ट्रेनिंग अंबाला कॅंटच्या एआर शूटींग अॅकेडमीत केली. अभिषेक राणा असे त्याच्या कोचचे नाव आहे. 

7/9

ज्युनिअर वर्ल्ड कप विजेता

Paris Olympic 2024 Sarabajot Singh won bronze medal with Manu Bhaker

सरबज्योत सिंगने याआधी अनेक महत्वाचे सामने जिंकले आहेत. 2019 मध्ये आयएसएसएफ ज्युनिअर वर्ल्ड कप जिंकले होते. 2021 मध्ये तिने वर्ल्डकप चॅम्पियन्सशिपमध्ये सिंगल आणि टीम इव्हेंटमध्ये गोल्ड जिंकले होते.

8/9

डेब्यूमध्येच ब्रॉन्झ मेडल

Paris Olympic 2024 Sarabajot Singh won bronze medal with Manu Bhaker

2023 मध्ये त्याने या कारनाम्याची पुनरावृत्ती केली आणि गोल्ड जिंकले. ऑलिम्पिकमध्ये प्रथमच खेळणाऱ्या सरबज्योतने आपल्या डेब्यूमध्येच ब्रॉन्झ मेडल कमावले.

9/9

2 मेडल जिंकणारी पहिली भारतीय

Paris Olympic 2024 Sarabajot Singh won bronze medal with Manu Bhaker

मनू भाकर आणि सरबजीतच्या जोडीने कोरियाच्या खेळाडुंना मात दिली. यानंतर मनू भाकर ही ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरलीय.