सततच्या खोकल्याकडे दुर्लक्ष करु नका; असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

खोकला ही एक सामान्य समस्या आहे आणि म्हणूनच लोक याला गांभीर्याने घेत नाहीत. परंतु हे लक्षात ठेवा की खोकला अनेक आठवडे कायम राहिल्यास तो गंभीर आजाराचे लक्षणे असू शकते 

| Jul 09, 2023, 19:43 PM IST

What Is Tb Disease: खोकला ही एक सामान्य समस्या आहे आणि म्हणूनच लोक याला गांभीर्याने घेत नाहीत. परंतु हे लक्षात ठेवा की खोकला अनेक आठवडे कायम राहिल्यास तो गंभीर आजाराचे लक्षणे असू शकते 

1/5

सततच्या खोकल्याकडे दुर्लक्ष करु नका; असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

persistent and prolonged cough could be warning sign of tuberculosis in marathi

हिवाळ्यात किंवा थंडी जास्त असेल तर खोकला होणं सामान्य बाब आहे. मात्र, खोकल्याची तीव्रता अधिक असेल आणि एक आठवड्यापासून सतत खोकला येत असेल तर मात्र, तुम्हाला वेळीच पावलं उचलण्याची गरज आहे. कारण दीर्घकाळ खोकला असणे ही गंभीर आजाराचे लक्षण ठरु शकते.   

2/5

वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

persistent and prolonged cough could be warning sign of tuberculosis in marathi

एक आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला टिकला असेल तर दुर्लक्ष करणे धोकादायक ठरु शकते. त्यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करुन घ्या. कारण सतत खोकला येणे हे क्षयरोग म्हणजेच टीबीचे लक्षण असू शकते.

3/5

दोन आठवडे

persistent and prolonged cough could be warning sign of tuberculosis in marathi

दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकणारा खोकला हे टीबीचे लक्षण असू शकते. कधीकधी टीबीचा खोकला एक महिन्यांपर्यंत जात नाही. जर वेळीच उपचार नाही घेतले तर हा आजार गंभीर ठरुन शकतो.   

4/5

टीबीची लक्षणे

persistent and prolonged cough could be warning sign of tuberculosis in marathi

-सततचा खोकला जो तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकतो -छातीत दुखणे किंवा अस्वस्थता -थकवा किंवा अशक्तपणा -ताप आणि रात्री घाम येणे -भूक न लागणे आणि वजन कमी होणे -खोकल्याने रक्त किंवा कफ येणे

5/5

काय काळजी घ्याल

persistent and prolonged cough could be warning sign of tuberculosis in marathi

मुलांना जन्मानंतर एका महिन्याच्या अंतराने BCGची लस द्या टीबी हा संसर्गजन्य असल्याने टीबीच्या रुग्णाजवळ जात असाल तर तोंडाला मास्क लावा