विजेच्या बिलापासून सुटका; लावा ७ हजार रूपयांमध्ये सौर पॅनेल

Sep 02, 2020, 13:36 PM IST
1/6

अक्षय ऊर्जा

अक्षय ऊर्जा

ऊर्जेच्या बाबतीतही भारत आत्मनिर्भर होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे सरकार सौर ऊर्जेला प्राधान्य देत आहे.  यासाठी केंद्रासह सर्व राज्य सरकार सौरऊर्जेवर अनुदान देत आहेत.  

2/6

सौर ऊर्जा

सौर ऊर्जा

आताच्या घडीला  शेतात, घरात,  कार्यालय आणि कारखान्यांमध्ये सौर उर्जाचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे  बस, मोटर, कार  देखील सौर ऊर्जेवर चालतात.  

3/6

सर्व घरांमध्ये सोलार पॅनल

सर्व घरांमध्ये सोलार पॅनल

सद्य स्थितीमध्ये हरियाणा सरकार ऊर्जा क्षेत्रात प्रत्येक घराला आत्मनिर्भर बनवण्यासाठी सौर ऊर्जेला प्रोत्साहन देत आहे. शिवाय राज्यातील प्रत्येक घरात सौर पॅनेल बसविण्यासाठी विशेष योजना चालविली जात आहे.

4/6

मनोहर ज्योती योजना

मनोहर ज्योती योजना

'मनोहर ज्योती योजने' अंतर्गत प्रत्येक कुटुंब ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे नेहमी येणाऱ्या वीज बिलापासून  नागरिकांची सुटका होणार आहे. हरियाणा सरकारने २०१७ पासून राज्यात मनोहर ज्योती योजना लागू केली आहे. 

5/6

१५ हजार रूपयांची सब्सिडी

१५ हजार रूपयांची सब्सिडी

वैज्ञानिक अभियंता पी.के. नौटियाल यांच्या सांगण्यानुसार १५० वॅटचं सोलार पॅनल लावण्यासाठी २२ हजार ५०० रूपयांचा खर्च येतो. हरियाणा सरकार यावर १५  हजार रूपयांची सब्सिडी देत आहे. त्यामुळे नागरिकांना सोलार पॅनल लावण्यासाठी ७ हजार ५०० रुपयांचा खर्च येणार आहे.

6/6

लागणारी कागदपत्रे

लागणारी कागदपत्रे

'मनोहर ज्योती योजने' साठी आधार कार्ड, बँक खाता, हरियाणामध्ये राहत असलेल्या वास्तव्याचा दाखला हे कागदपत्रे लागणार आहेत.