Virat Kohli : ग्लॅमरमध्ये अभिनेत्रींपेक्षा कमी नाही विराट कोहलीची वहिणी, अनुष्कालाही देते टक्कर

Virat Kohli Family: टीम इंडियाची (Team India) रनमशीन विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या खेळीने जगभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. कठिण परिस्थितही टीम इंडियाला विजय मिळवून देणारा विराट कोहली स्टाईल आयकॉन (Style Icon) म्हणूनही ओळखला जातो. विराटची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री (Bollywood Actress) आहे. याशिवाय विराटच्या कुटुंबात आई, मोठा भाऊ आणि त्यांची पत्नी आहे. विराटच्या मोठ्या भावाचं नाव विकास कोहली (Vikas Kohli) आहे तर त्यांच्या पत्नीचं नाव चेतना कोहली (Chetna Kohli) असं आहे. चेतना कोहली ही देखील ग्लॅमरमध्ये अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. 

Jan 05, 2023, 18:16 PM IST
1/6

विराट कोहलीचा मोठा भाऊ विकास कोहलीचं चेतनाशी लग्न झालं. विराटसारखाच विकास कोहलीही दिसण्यात स्मार्ट आणि हँडसम आहे.

2/6

विराट आणि विकास-चेतनाचे नातेसंबंधही खूपच चांगले आहेत. पण क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे विराट कोहलीला आपल्या कुटुंबासोबत फारच कमी वेळ देता येतो.

3/6

चेतना कोहली सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. विकासबरोबरचे अनेक फोटो चेतना सोशल मीडियावर शेअर करत असते.

4/6

चेतना कोहली हाऊसवाईफ आहे, पण तिची लाईफस्टाइल अलिशान आहे. विकास आणि चेतना दिल्लीत राहतात.

5/6

चेतना कपड्यांबरोबरच आपल्या फिटनेसवरही लक्ष देते. सोशल मीडियावर यांसंदर्भातले फोटो ती शेअर करत असते. 

6/6

विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या रिसेप्शन पार्टीत चेतना आणि विकासने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.