फोटो : नाना पाटेकरांना मातृशोक, मुंबईत अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांची आई निर्मला पाटेकर यांचं वयाच्या ९९ व्या वर्षी निधन

Jan 30, 2019, 15:43 PM IST
1/8

मुंबईत घेतला अखेरचा श्वास

मुंबईत घेतला अखेरचा श्वास

वृद्धापकाळानं त्या गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त होत्या. मंगळवारी २९ जानेवारी रोजी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. 

2/8

दीर्घकाळापासू आजारी

दीर्घकाळापासू आजारी

नाना पाटेकर यांच्या आई निर्मला या विस्मृतीनंही त्रस्त होत्या. आपल्या आजुबाजुच्या लोकांनाही ओळखणं त्यांना कठिण बनलं होतं. 

3/8

मुंबईत निघाली अंत्ययात्रा

मुंबईत निघाली अंत्ययात्रा

निर्मला पाटेकर यांच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर अनेक मराठी कलाकार त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते

4/8

आईसाठी...

आईसाठी...

नाना पाटेकर आपल्या वृद्ध आईची काळजी घेताना दिसत होते... आईसाठीच ते आईसोबत वन बीएचके फ्लॅटमध्ये राहत होते.

5/8

मिळकत केली दान

मिळकत केली दान

काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर यांनी आपली जवळपास सर्व मिळकत दान केली होती. त्यानंतर ते या फ्लॅटमध्ये राहायला आले होते

6/8

नाना पाटेकर भावूक

नाना पाटेकर भावूक

'मी जेव्हाही आईबद्दल बोलत असतो तेव्हा मला काहीतरी होतं... मला माहीत आहे की ती या जगाचा कधीही निरोप घेऊ शकते, त्यामुळे जेव्हा मला फोन येतो तेव्हा मी घाबरतो. जेव्हाही आई मला बाहेर जाताना पाहते, तेव्हा ती माझा हात पकडते आणि रडायला लागते' असं काही दिवसांपूर्वी म्हणताना नाना भावूक झाले होते. 

7/8

निर्मला पाटेकर यांच्यावर अंत्यसंस्कार

निर्मला पाटेकर यांच्यावर अंत्यसंस्कार

मुंबईत निर्मला पाटेकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले

8/8

मल्हारही उपस्थित

मल्हारही उपस्थित

यावेळी नानांचा मुलगा मल्हार पाटेकरही उपस्थित होता