#IrrfanKhan : अभिनयातला 'साहबजादा' हरपला....

इरफान अली  खान काळाच्या पडद्या आड...

Apr 29, 2020, 13:17 PM IST
1/5

बॉलिवूड अभिनेता इरफान अली  खान याचं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते.  

2/5

अखेर वयाच्या 54व्या वर्षी यांनी कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.   

3/5

इरफान यांना गेल्या काही वर्षांपूर्वी त्याला हाय ग्रेड न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर असल्याचं समजलं होतं.   

4/5

2017च्या जून महिन्यात या आजाराबाबत समजल्यानंतर इरफान परदेशात या कॅन्सरवर उपचार करण्यासाठी गेला होता.  

5/5

‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या.