वर्णभेदावरून बॉलिवूडमध्ये ट्रोल झालेले कलाकार

गेल्या काही दिवसांपासून गोऱ्या आणि सावळ्या रंगावरून संपूर्ण जगात वाद सुरू आहे.

Jul 04, 2020, 16:11 PM IST

गेल्या काही दिवसांपासून गोऱ्या आणि सावळ्या रंगावरून संपूर्ण जगात वाद सुरू आहे. अमेरिकेत सुरू झालेल्या 'Black Lives Matter'ची झळ आता बॉलिवूडला देखील बसली आहे. शिवाय याचे गंभीर परिणाम देखील समोर येत असल्याचे दिसून येत आहेत. आता फेयरनेस क्रीमविरूद्ध नवे युद्ध सुरू झाले आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना त्यांच्या सावळ्या रंगावरून अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तर जाणून घेवूया अशा काही कलाकारांच्या व्यथा...

1/5

बिपाशा बासू

बिपाशा बासू

लहानपणापासूनच बिपाशा बासूला तिच्या सावळ्या रंगावरून अनेक अडचणींचा सामना करावा लागला. शिवाय बॉलिवूडमध्ये आल्यानंतर देखील तिने वर्णभेदावरून उद्भवलेल्या अनेक संकटांना तोंड दिलं आहे. 

2/5

मनोज बाजपेयी

मनोज बाजपेयी

एका मुलाखतीत मनोज बाजपेयीने सांगितलं होतं की, 'जरी माझ्या अभिनयाचं कौतुक झालं असलं तरी एका क्रिटीकने म्हटलं होतं की मी कोणत्या राजा सारखा दिसत नाही. त्यांच्या या वक्याने मला फार वाईट वाटलं होतं.' 

3/5

नवाजुद्दीन सिद्दीकी

नवाजुद्दीन सिद्दीकी

नवाजुद्दीन सिद्दीकीला बर्‍याच प्रसंगी आपल्या सावळ्या रंगावरून ऐकावे लागले आहे. शिवाय वर्णभेदावरून  बॉलिवूडमध्ये देखील त्यांनी अनेक समस्यांचा सामना केला आहे. 

4/5

शांती प्रिया

शांती प्रिया

एका चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान एका मोठ्या स्टारने शांतीच्या सावळ्या रंगावरून तिची खिल्ली उडवली होती. याचं स्पष्टीकरण खुद्द शांतीनेएका मुलाखतीत दिलं होतं. 

5/5

धनुष

धनुष

बॉलिवूडमध्ये धनुषला देखील त्याच्या सावळ्या रंगावरून अनेक अडचणींचा सामना करावा लागला.