कोरोनाची ९ सर्वात महत्वाची लक्षणे

कोरोणाची लक्षण सामान्य असल्याने सुरुवातीला त्याची लागण झाल्याचं लक्षात येत नाही.

| Mar 28, 2020, 18:38 PM IST

कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत जवळपास ६ लाख लोकांना संक्रमण झालं आहे. जगभरातील शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की कोरोना विषाणूची लक्षणे ही सामान्य सर्दीशी इतकी समान असतात की त्यांचे रुग्ण ओळखणे फार कठीण आहे. म्हणूनच लोकं मोठ्या प्रमाणात याचे शिकार होत आहेत. डब्ल्यूएचओने कोरोनाची काही लक्षणे सांगितली आहेत, ज्याद्वारे आपण कोरोनाची लागण झाली आहे का हे ओळखू शकतो.

1/9

९. चीन आणि अमेरिकेतील बऱ्याच रुग्णांनी सांगितले आहे की, कानात दडपणासारखे काहीतरी जाणवते.

2/9

८. कोरोनाच्या बऱ्याच रुग्णांनी असा दावाही केला आहे की रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर ते जिभेला स्वाद कळत नाही.

3/9

७. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या नाकातून सतत पाणी वाहते. सर्दीसारखे लक्षण दिसतात.

4/9

६. कोरोनाची लागण झाल्यानंतर घश्यात खूप वेदना होत होती. ही वेदना इतकी असते की घशात सूज देखील येते.

5/9

५. मासपेशींमध्ये आणि स्नायूंच्या वेदनाबरोबरच थकवा जाणवतो.

6/9

४. कोरोनाची लागण झाल्यानंतर शरीरातील सांधे खूप दुखू लागतात.

7/9

३. कोरोनामुळे रुग्णाला श्वास घेण्यात त्रास होण्यास सुरवात होते. वृद्ध रुग्णांमध्ये श्वासोच्छवासाची समस्या अधिक दिसून आली आहे.

8/9

२. रुग्णाला जास्त ताप येऊ लागतो आणि त्याच्या शरीराचे तापमान खूप वाढते. आतापर्यंत अनेक आरोग्य तज्ञांनी कोरोनामुळे उच्च ताप येत असल्याचा दावा केला आहे.

9/9

१. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर सुरुवातीला व्यक्तीला कोरडा खोकला येतो. त्यानंतर फुफ्फुसात श्लेष्मा वेगाने वाढू लागते.