'बाहुबली फेम' देवसेनेच्या लूकमध्ये दिसली जॅकलिन फर्नांडिस

जॅकलिनचा हटके लूक 

Mar 06, 2020, 08:19 AM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या नव्या लूकमूळे चांगलीच चर्चेत आहे. 'बाहुबली' फेम देवसेनेच्या लूकमधील तिचं नवं फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. त्याचप्रमाणे तिच्या हातात असलेला धणुष्यबाण आकर्षक दिसत आहे. जॅकलिनने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. तिचा हा नवा अंदाज चाहत्यांच्या कमालीचा पसंतीस पडत आहे.

1/5

जॅकलिनचा देवसेना लूक मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

2/5

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये पारंपरिक अंदाजात जॅकलिन प्रचंड आकर्षक दिसत आहे.

3/5

शिवाय तिच्या हातातील धणुष्यबाण सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

4/5

जॅकलिनच्या या नव्या लूकची तुलना अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत करण्यात येत आहे. 

5/5

तिच्या या लूकने चाहत्यांना चांगलेच घायाळ केले आहे. जॅकलिनने तिचे हे सर्व फोटो सोशल मीडिया इन्स्ग्रामवर पोस्ट केले आहेत.