तब्बल २८ वर्षांनंतर राम जन्मभूमी परिसरात शिवलिंगाचा रुद्राभिषेक
अयोध्या येथील रामजन्मभूमी परिसरातत कुबेर टीलावर कुबेरेश्वर महादेवाचे रुद्राभिषेक करण्यात आला.
अयोध्या येथील रामजन्मभूमी परिसरातत कुबेर टीलावर कुबेरेश्वर महादेवाचे रुद्राभिषेक करण्यात आला. रुद्राभिषेक करत असताना महंत कमलनयन दास यांच्यासोबत अध्यक्ष कन्हैया दास, आचार्य आनंद शास्त्री देखील उपस्थित होते. महंत कमलनायन दास यांनी सांगितले की, राष्ट्रीय अडचणी, देशात कोरोनाचा कहर दूर झाला पाहिजे. श्री रामांचे भव्य मंदिर लवकरात लवकरात बांधण्यात यावे हिच इच्छा मनात ठेवून रुद्राभिषेक करण्यात आला आहे, शिवाय तब्बल २८ वर्षांनंतर राम जन्मभूमी परिसरात शिवलिंगाचा रुद्राभिषेक करण्यात आल्याचं स्पष्टीकरण देखील त्यांनी यावेळेस दिलं.