COVID-19 : गावी परतण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी
योगी सरकार तात्काळ बससेवा उपलब्ध करून दिली.
कोरोना व्हायरसची भीती दिवसागणिक वाढत असताना दिसत आहे. सरकार ऐकीकडे एकाच ठिकाणी गर्दी न करण्यासाठी आवाहन करत आहे तर दुसरीकडे मात्र लोक पायी गावी पोहोचण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. १४ एप्रिलपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारतात लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे हातावर पोट असण्यांनी गावी जाण्यासाठी पायी जाण्याचा मार्ग अवलंबला आहे. शुक्रवारी मोठ्या संख्येने कामगार गावी जाण्यासाठी रस्त्यावर उतरले. दिल्ली-मध्य प्रदेशच्या सीमेवर त्यांनी प्रचंड गर्दी केली. कामगारांची वाढती गर्दी लक्षात घेता मुख्यमंत्री योगी सरकारने त्यांना सुखरूप घरी पोहोचवण्यासाठी तत्कळ बस सेवा उपलब्ध करून दिली. त्यामुळे गर्दी नियंत्रणात आणण्यात मोठी मदत झाली.