काजोलची मुलगी न्यासा की शाहरुखची मुलगी सुहाना... कोणाची स्टाईल 'लय भारी'

Entertainment : बॉलिवूड स्टार्सबरोबरच (Bollywood Star) त्यांच्या मुलांचीही नेहमीच चर्चा होत असते. स्टार किड्स (Star Kids) असल्याने त्यांच्यावर कायमच कॅमेरे रोखलेले असतात. बॉलिवूडमध्ये स्टार किड्स लोकप्रिय होण्याचा ट्रेंड आहे. सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांची मुलं देखील सोशल मीडियावर हिट आहेत. जान्हवी कपूर (Janhvi Kapoor), सारा अली खानने (Sara Ali Khan) बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तर सुहाना खान (Suhana Khan) आणि न्यासा देवगन (Nysa Devgan) अद्याप बॉलिवूडपासून दूर आहे. न्यासा आणि सुहानाकडे फॅशन आयकॉन म्हणून पाहिलं जातं. युवा वर्गात त्यांच्या फॅशनची चांगलीच क्रेझ आहे. 

Jan 12, 2023, 18:49 PM IST
1/7

बॉलिवूड स्टार किड्समध्ये सर्वात पहिला क्रमांक लागतो तो शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा. सुहाना खान आपल्या लूकमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

2/7

नविन वर्षाच्या पार्टीत अजय देवगन आणि अभिनेत्री काजोलची मुलगी न्यासा देवगण (Nysa Devgan) हिच्या ग्लॅमरस फोटोंनी धुमाकूळ घातला होता. तिच्या अचानक बदलेल्या लूकची सोशल मीडियावर एकच चर्चा होती

3/7

सुहाना आणि न्यासा दोघीही स्टाईल आयकॉन आहेत. फॅशनमध्ये कोण वरचढ आहे ते आपण पाहूया. एका पार्टीत न्यासाने पिंक बॉडी कॉन ड्रेस परिधान केला होता. तर सुहाना खानने स्ट्रेप टॉप परिधान केला होता. 

4/7

वेकेशन लूकमध्ये ब्लॅक स्ट्रेप्ड टॉपमध्ये खूपच सुंदर दिसतेय. यासोबत तीने व्हाईट स्कर्ट आणि मॅचिंग टॉप परिधान केला आहे. तर ब्लॅक जीन्स आणि क्रीम टॉपमध्ये सुहाना खानचं सौंदर्यदेखील खुलून दिसंतय. 

5/7

ट्रेडिशन लूकमध्येही न्यासा आणि सुहानाची बरोबरी केली जाते. ब्ल्यू शेडच्या लेहंग्यात न्यासा तर पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुहाना ग्लॅमरस दिसतायत.

6/7

या फोटोत आपण पाहू शकता, न्यासाने केशरी रंगाचा डीप नेक बॉडी कॉन ड्रेस तर सुहानाने पिवळ्या रंगाता वन शोल्डर बॉडी कॉन ड्रेस परिधान केला आहे.

7/7

न्यू ईयर पार्टीत न्यासाच्या डीप नेक ब्लॅक स्लीव्स मिनी ड्रेसची चांगलीच चर्चा झाली होती. तर वूलन स्वेटरमध्ये सुहानाचा लूक खुलून दिसत होता.