Fertility Diet: गर्भधारणेदरम्यान समस्या येतेय? आहारात करा हे बदल!

आजकाल काही महिलांना गर्भधारणा न होण्याची समस्या अधिक दिसून येते. मात्र तुम्हाला माहितीये का? योग्य आहार घेतला तर गर्भ राहण्याची शक्यता वाढते. जर तुम्ही जंक आणि प्रोसेस फूड खाण्याची सवय असेल तर तुम्हाला या सवयी बदलाव्या लागतील. गर्भ राहण्यासाठी तुम्हाला हेल्दी पदार्थ तुमच्या डाएटमध्ये सहभागी करावे लागतील.

Jan 12, 2023, 17:55 PM IST
1/4

फॉलिक एसिड (Folic acid)

फॉलिक एसिड व्हिटॅमिन बी 9 चा एक स्त्रोत आहे. शरीरातील लाल रक्तपेशी तयार करणं आणि प्रतिकारशक्ती वाढवणं हे याचं म्हहत्त्वाचं काम आहे. शरीरात या पोषणाची कमतरता असेल तर मुलामध्ये कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो. म्हणूनच गर्भधारणेसाठी आहारामध्ये फॉलिक एसिडचा समावेश करणे आवश्यक आहे.  

2/4

व्हिटॅमीन बी 12

हे व्हिटॅमीन मज्जासंस्थेचं कार्य योग्य ठेवण्यासाठी आणि रक्त निर्मितीमध्ये मदत करतं. या व्हिटॅमीनच्या कमतरतेमुळे अनेक दोष निर्माण होऊ शकतात.

3/4

ओमेगा 3 फॅटी एसिड

ओमेगा 3 फॅटी ऍसिड रक्तदाब कमी करण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास फायदेशीर ठरतं. गर्भवती महिला तसंच बाळाच्या मेंदू आणि डोळ्यांच्या विकासासाठी हे योग्य मानलं जातं.

4/4

या पदार्थांचं सेवन करू नये

तुम्ही गर्भ राहण्याची अपेक्षा करत असाल तर तुम्ही ट्रान्स फॅटचं सेवन करू नका. यामध्ये प्रक्रिया केलेले मांस, अधिक गोड पदार्थ आणि सोडायुक्त ड्रिंक्स यांचा समावेश आहे.