Smriti Irani Daughter Marriage: लेक लाडकी या घरची! स्मृती इराणींच्या मुलीच्या शाही विवाहसोहळ्याची तयारी, पाहा सेलिब्रेशनचे PHOTOS

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (smriti irani) सध्या मुलीच्या लग्नाच्या तयारीत व्यग्र आहेत. शनेल इराणी (shanelle irani) लवकरच अर्जुन भल्लासह (Arjun Bhalla) विवाहबंधनात (Marriage) अडकणार आहे. 9 फेब्रुवारीला हा विवाहसोहळा पार पडणार आहे.   

Feb 09, 2023, 19:58 PM IST
1/7

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (smriti irani) यांची मुलगी शनेल इराणी (shanelle irani) लवकरच विवाहबंधनात (Marriage) अडकणार आहे. 9 फेब्रुवारीला अर्जुन भल्लासह (Arjun Bhalla) शनेल विवाहबंधनात अडकणार आहे. राजस्थानमधील (Rajasthan) नागौर (Nagaur) येथील खिमसर किल्ल्यात (Khimsar Fort) हा विवाहसोहळा पार पडणार आहे. अत्यंत थाटामाटात हे लग्न पार पडणार असून किल्ल्यामध्ये सजावट करण्यात आली आहे.     

2/7

स्मृती इराणी 8 फेब्रुवारीला मुलगी Zoish Irani सह विवाहपूर्वीच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी पोहोचल्या होत्या. 250 पाहुणे यावेळी उपस्थित होते. किल्ल्यात पार पडलेल्या मेहंदी आणि संगीत कार्यक्रमाचे काही फोटो समोर आले आहेत.   

3/7

किल्ल्यात लाईटिंग तसंच दिव्यांची आरास करण्यात आली होती. यावेळी शनेल आणि अर्जुन यांनी पारंपारिक पोषाख परिधान केला होता.   

4/7

कंदीलांचं डेकोरेशन आणि वाळू यांचं कॉम्बिनेशन उठून दिसत होतं. प्रवेशद्वारावर जोडप्याची अद्याक्षरं लावण्यात आली होती.   

5/7

काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न होणार असून किल्ल्याभोवती कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.   

6/7

याच किल्ल्यात डिसेंबर 2021 ला शनेल आणि अर्जुन यांचा साखरपुडा पार पडला होता. त्यावेळी स्मृती इराणी यांनी Instagram ला फोटो शेअर केले होते.   

7/7

शॅनेल एक वकील आणि जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी लॉ सेंटर, वॉशिंग्टन डीसी, यूएसची माजी विद्यार्थी आहे.