Sidharth च्या त्या कृतीमुळे लाजली Kiara; Mumbai Airport बाहेर दिल्या Romantic Poses

Sidharth and Kiara Latest Photo: जैसलमेरमध्ये लग्न केल्यानंतर सिद्धार्थ आपल्या पत्नी कियाराबरोबर थेट दिल्लीतील घरी पोहोचला. त्यानंतर हे दोघे मुंबईमध्ये दाखल झाले. या दोघांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी सिद्धार्थ केलेल्या एका कृतीमुळे कियारा सर्वांसमोर हळूच लाजल्याचं दिसून आलं.

Feb 11, 2023, 20:39 PM IST
1/5

Sidharth and Kiara Latest Photo

लग्नानंतर सिद्धार्थ मल्होत्रा (sidharth malhotra) आणि कियारा आडवाणी (kiara advani) पहिल्यांदाच मुंबईमध्ये दाखल झाले. आज म्हणजेच 11 फेब्रुवारी रोजी हे दोघे मुंबईत आले.

2/5

Sidharth and Kiara Latest Photo

एका प्रायव्हेट विमानतळावर सिद्धार्थ आणि कियारा या आपल्या आवडत्या जोडप्याला पाहण्यासाठी लोकांनी आणि प्रसारमाध्यमांनी गर्दी केली. हे दोघेही हातात हात पकडून विमानतळाबाहेर येताना दिसले. या दोघांवरुनही लोकांच्या नजरा हटत नव्हत्या.

3/5

Sidharth and Kiara Latest Photo

पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजम्यात सिद्धार्थ मल्होत्रा फारच सुंदर दिसत होता. तर पिवळ्या रंगाच्या डिप नेक अनारकली सूटमध्ये कियारा आडवाणीही चाहत्यांचं लक्ष वेधून घेत होती. कियारा इंडियन लूकमध्ये फारच सुंदर दिसत होती. गळ्यात मंगळसूत्र, हातात चूडा घातलेली कियारा फारच लाजत होती.

4/5

Sidharth and Kiara Latest Photo

हातात हात पकडून दोघेही बाहेर येतानाचे फोटो प्रसारमाध्यमांच्या कॅमेरात कैद झाले. जेव्हा सिद्धार्थने कियाराबरोबर सर्वांसमोर मस्करी केली तेव्हा नव्या नवरीप्रमाणे कियारा लाजली. दोघांनी प्रसारमाध्यमांना पोज दिल्या आणि त्यानंतर मिठाईचे बॉक्स वाटले.

5/5

Sidharth and Kiara Latest Photo

कियारा आणि सिद्धार्थचं रिसेप्शन मुंबईत होणार आहे. रविवारी हे रिसेप्शन हॉटेल रेजिसमध्ये पार पडणार आहे. या ठिकाणी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी येणार आहेत. शाहरुख खान, सलमान खान, वरुण धवनसारख्या अनेक सेलिब्रिटींनी आमंत्रित करण्यात आलं आहे.