Pm Modi Birthday: 9 वर्ष पंतप्रधान, 13 वर्ष मुख्यमंत्री, PM मोदींकडे आहे इतकी संपत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 73वा वाढदिवस आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात  येत आहे. नरेंद्र मोदी हे 9 वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. अशावेळी मोदींच्या संपत्तीबाबत अनेकदा चर्चा होत असतात. आज जाणून घेऊया मोदींची नेमकी संपत्ती किती आहे. 

Sep 17, 2023, 12:36 PM IST

PM Modi Turns 73: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 73वा वाढदिवस आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात  येत आहे. नरेंद्र मोदी हे 9 वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून कार्यरत आहेत. अशावेळी मोदींच्या संपत्तीबाबत अनेकदा चर्चा होत असतात. आज जाणून घेऊया मोदींची नेमकी संपत्ती किती आहे. 

1/7

Pm Modi Birthday: 9 वर्ष पंतप्रधान, 13 वर्ष मुख्यमंत्री, PM मोदींकडे आहे इतकी संपत्ती

PM Modi Turns 73 Narendra Modi Net Worth Salary Assets

 पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014पासून देशाचे पंतप्रधान आहेत. तर सलग 13 वर्ष ते गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. 

2/7

पंतप्रधानांचा पगार

PM Modi Turns 73 Narendra Modi Net Worth Salary Assets

पंतप्रधान मोदी यांना महिन्याला जवळपास दोन लाख रुपये पगार मिळतो. यापगारात इतर भत्ते व पंतप्रधान आवास या सुविधांचाही समावेश आहे. 

3/7

2.23 कोटींची संपत्ती

PM Modi Turns 73 Narendra Modi Net Worth Salary Assets

 पंतप्रधान मोदी यांच्याकडे एकूण 2.23 कोटींची संपत्ती आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोदींची 2.23 कोटींची संपत्ती वेगवेगळ्या बँकांमध्ये जमा आहे. 

4/7

जमीन केली दान

PM Modi Turns 73 Narendra Modi Net Worth Salary Assets

पंतप्रधान मोदी यांच्याकडे कोणतीही अचल संपत्ती (Immovable Assets) नसल्याचे समोर आले आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी भागीदारीमध्ये निवासी जमीन खरेदी केली होती. मात्र, काही काळाने त्यांनी त्यांच्या वाट्याची जमीन दान केली असल्याचे समोर आले आहे. 

5/7

LIC पॉलिसी

PM Modi Turns 73 Narendra Modi Net Worth Salary Assets

31 मार्च 2022 पर्यंत पंतप्रधान मोदींकडे रोख रक्कम फक्त 35,250 रुपये इतकी होती. त्याशिवाय पोस्ट ऑफिसमध्ये ९,०५,१०५ रुपयांची नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफेकेट्स (NSC) आहेत. तर, 1,89,305 रुपयांची LIC पॉलिसी आहे. 

6/7

चार सोन्याच्या अंगठ्या

PM Modi Turns 73 Narendra Modi Net Worth Salary Assets

पंतप्रधान मोदींकडे एकूनण चार सोन्याच्या अंगठ्या आहेत. त्याचे वजन 45 ग्रॅम असून किंमत 1.13 लाख इतकी आहे.

7/7

गुंतवणूक किती

PM Modi Turns 73 Narendra Modi Net Worth Salary Assets

एका अहवालानुसार, पंतप्रधानांनी कोणत्याही बाँड, स्टॉक किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेली नाही. त्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाहीये. त्याचबरोबर त्यांचे नावे घरही नसल्याचे समोर आले आहे.