पुण्यातील RTI कार्यकर्त्यानं विचारलं, मोदींनी 2014 पासून किती सुट्या घेतल्या? उत्तर आलं....

PM Modi Leave: पुण्यातील एका आरटीआय कार्यकर्त्याने थेट पंतप्रधान कार्यालयातून पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) सुट्टीची माहिती मागवली. 2014 सालापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती सुट्ट्या (Leave) घेतल्या याची माहिती त्याने मागवली. यावर पीएमओ कार्यालयकडून आलेलं उत्तर आश्चर्यकारक आहे.   

| Sep 04, 2023, 20:00 PM IST

PM Modi Leave: पुण्यातील एका आरटीआय कार्यकर्त्याने थेट पंतप्रधान कार्यालयातून पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) सुट्टीची माहिती मागवली. 2014 सालापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती सुट्ट्या (Leave) घेतल्या याची माहिती त्याने मागवली. यावर पीएमओ कार्यालयकडून आलेलं उत्तर आश्चर्यकारक आहे. 

 

1/7

नोकरदारवर्ग दररोज साधाराण आठ ते नऊ तास काम करतो आणि आठवड्यात एक किंवा दोन सुट्टया घेतो. पण तुम्हाला माहित आहे का आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज किती तास काम करतात आणि किती दिवस सुट्ट्या घेतात.  

2/7

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पंतप्रधानपदाची पहिल्यांदा शपथ घेतली. त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा एकाद पीएम मोदी (PM Modi) सत्तेत आले. गेल्या 9 वर्षात पीएम मोदी यांनी देश आणि विदेशात जवळपास 3000 हून अधिक कार्यक्रमात भाग घेतला.   

3/7

पुण्यातील आरटीआय (RTI) कार्यकर्ते प्रफुल्ल सरडा यांना आरटीआयतंर्गत ही माहिती मागवली होती. याशिवाय प्रफुल्ल सरडा यांनी आणखी एक माहिती मागवली होती. नरेंद्र मोदी यांनी 2014 साली पंतप्रधानपदाचा पदभार स्विकारल्यानंतर कार्यलायात (PMO Office) किती दिवस उपस्थिती लावली आहे?

4/7

आरटीआय कार्यकर्ते प्रफुल्ल सरडा यांनी मागवलेल्या माहितीला पंतप्रधान कार्यालयातून उत्तर आलं. उत्तर वाचून प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसेल. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्विकारल्यानंतर म्हणजे गेल्या नऊ वर्षात एकही सुट्टी (Leave) घेतली नाही. असं या उत्तरात नमुद करण्यात आलं आहे. 

5/7

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवसातले जवळपास 18 ते 20 तास काम करतात, प्रवासात असताना ते विमानातच झोपतात. जेणेकरुन वेळ वाचेल. अशी माहिती याआधीही समोर आली होती. 

6/7

याआधी 2015 मध्ये देखील पंतप्रधान कार्यालयतून आरटीआयअंतर्गत पंतप्रधान मोदींच्या सुट्टीबाबत माहिती मागवण्यात आली होत. तेव्हाही पंतप्रधान मोदी यांनी एकही सुट्टी घेतली नसल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यावेळी केवळ एक वर्षाची माहिती देण्यात आली होती. आता पीएम मोदी यांना नऊ वर्ष झाली आहेत आणि या नऊ वर्षात मोदींनी आपल्या कामाचा धडाका सुरुच ठेवला आहे. 

7/7

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत 20 वर्ष झाल्याबद्दल अभिनंद केलं होतं. गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधान असे गेले 20 वर्ष पीएम मोदी सत्तेत आहेत. विशेष म्हणजे गेल्या 20 वर्षात नरेंद्र मोदी यांनी एकही सुट्टी घेतलेली नाहीए. 24 तास मोदी देशासाठी काम करतात असं अनुराग ठाकूर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. गेल्या वीस वर्षात पीएम मोदी यांच्यावर जीतके आरोप झाले तितकेच ते ताकदवर झाले असंही अनुराग ठाकूर यांनी म्हटलं होतं.