37 हजारांची बचत, टचस्क्रीन, 118 फिचर्स, 30 पैसे/KM एव्हरेज, 150 KM रेंज, किंमत..; बाजारात दमदार EV दाखल

New TVS Electric Scooter Saves Up To Rs 37500: कंपनीने नुकत्याच लॉन्च केलेल्या या स्कुटरमध्ये अनेक भन्नाच फिचर्स आहेत. तुम्हाल जाणून आश्चर्य वाटेल पण या स्कुटरमध्ये 118 फिचर्स आहेत. या स्कुटरचे एकूण पाच व्हेरिएंट कंपनीने लॉन्च केले असून त्यांची किंमत किती आहे तसेच ही स्कूटर इतर इलेक्ट्रीक वाहनांपेक्षा कशी वेगळी आहे हे पाहूयात, तसेच ऑफर्ससंदर्भातही जाणून घेऊयात...

| Jun 09, 2024, 14:40 PM IST
1/12

New TVS Electric Scooter Saves Up To Rs 37500

2/12

New TVS Electric Scooter Saves Up To Rs 37500

विशेष म्हणजे टीव्हीएसच्या या नव्या iQube चं व्हेरिएंट अगदी एक लाखांपासून कमी किंमतीत सुरु होतं. या स्कुटीमध्ये अनेक भन्नाट फिचर्स देण्यात आले आहेत.  

3/12

New TVS Electric Scooter Saves Up To Rs 37500

टीव्हीएस iQube ला एकदा चार्ज केल्यानंतर ती 150 किमीपर्यंत धावते असा कंपनीचा दावा आहे. या स्कुटीमध्ये टचस्क्रीनबरोबरच अॅलेक्सा स्कीलसेट देण्यात आलं आहे.  

4/12

New TVS Electric Scooter Saves Up To Rs 37500

17.7 सेंटीमीरची टचस्क्रीन टीव्हीएस iQube मध्ये देण्यात आली आहे. या स्कुटीमध्ये एकूण 118 फिचर्स असल्याचा दावा कंपनीने केला आहे.   

5/12

New TVS Electric Scooter Saves Up To Rs 37500

टीव्हीएसच्या iQube चे एकूण पाच व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले असून यापैकी नवे एसटी 3.4 केडब्ल्यूएच आणि एसटी 5.1 केडब्यूएच हे नवे व्हेरिएंट आहेत.  

6/12

New TVS Electric Scooter Saves Up To Rs 37500

टीव्हीएस iQube च्या सर्व व्हेरिएंटचा विचार केल्यास टॉप स्पीड 75 किलोमीटर प्रती तास ते 82 किलोमीटर प्रतीतासदरम्यान आहे.  

7/12

New TVS Electric Scooter Saves Up To Rs 37500

टीव्हीएस iQube ची बॅटरी 3 तासांमध्ये 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते असा कंपनीचा दावा आहे. यामध्ये युएसबी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. ही स्कूटी 30 पैसे प्रति किलोमीटर रेंज देते असं कंपनीने म्हटलं आहे.

8/12

New TVS Electric Scooter Saves Up To Rs 37500

स्टारलिंग ब्लू, टायटॅनियम ग्रे मॅट, कॅलर सँड ग्लॉसी, कॉपर ब्रॉन्झमध्ये एसटी 5.1 केडब्यूएच हे व्हेरिएंट उपलब्ध आहे. गाडीचं वजन 115 किलो इतकं आहे.  

9/12

New TVS Electric Scooter Saves Up To Rs 37500

अवघ्या 5 हजार रुपयांमध्ये टीव्हीएस iQube स्कूटी बूक करता येणार आहे.   

10/12

New TVS Electric Scooter Saves Up To Rs 37500

टीव्हीएस iQube च्या बेस व्हेरिएंटची किंमत वेगवेगळ्या मान्सून स्पेशल ऑफर्स अंतर्गत एक लाखा रुपयांहूनही कमी आहे. तसेच 30 पैसे प्रति किलोमीटर क्षमतेची ही गाडी वर्षभर वापरल्यास एका वर्षात 37,500 रुपयांचा नफा होईल असा दावा कंपनीने केला आहे. ऑफरअंतर्गत ही दुचाकी अवघ्या 94 हजार 999 मध्ये घरी घेऊन जाता येईल असं कंपनीचं म्हणणं आहे.  

11/12

New TVS Electric Scooter Saves Up To Rs 37500

टीव्हीएस iQube च्या 2.2 केडब्ल्यूएच व्हेरिएंटची एक्स शोरुम प्राइज 1,17,637 इतकी आहे. याच गाडीचं स्टॅण्डर्ड व्हेरिएंट 1,47,003 रुपयांच्या एक्स शोरुम प्राइजला उपलब्ध आहे.  

12/12

New TVS Electric Scooter Saves Up To Rs 37500

3.4 केडब्ल्यूएच व्हेरिएंट 1,56,795 रुपयांना शोरुममध्ये उपलब्ध असून एसटी 3.4 केडब्ल्यूएच व्हेरिएंटसाठी 1,65,911 रुपये मोजावे लागतील. गाडीचं टॉप व्हेरिएंट म्हणजेच एसटी 5.1 केडब्यूएच व्हेरिएंटची किंमत 1,85,729 रुपये इतकी आहे.