Prajakta Mali ला पहिला सिनेमा कसा मिळाला? जाणून घ्या सिनेमागची रंजक गोष्ट

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या खूपच चर्चेत असते. नुकतचं तिने आपल्या 'प्राजक्तराज' या नव्या ज्वेलरी ब्रँडची सुरूवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते  या ब्रॅण्डच्या उद्घाटनाची कार्यक्रम देखील पार पडली. आता पुन्हा एकदा प्राजक्ता माळी आपल्या या ब्रँडमुळे चर्चेत आली आहे. मात्र चर्चेत येण्यापूर्वी प्राजक्ता माळी कशी होती तसेच तिला पहिला सिनेमा कसा मिळाला यामागची रंजक गोष्ट जाणून घेऊया... 

Jan 22, 2023, 13:23 PM IST
1/6

2/6

सोनसळा या दागिन्यांच्या प्रकाराचं नाव खरं तर प्राजक्ताच्या पहिल्या सिनेमातून घेतलं आहे. प्राजक्ताचा पहिला  सिनेमा कोणता आणि त्यातली तिची भूमिका कोणती होती? याबद्दल जाणून घेऊया...   

3/6

2008 मध्ये आलेला तांदळ हा प्राजक्ता माळीचा पहिला सिनेमा होता. ज्यात तिला तरुणपणीच्या आसावरी जोशी यांची भूमिका साकारायची होती.यात तिच्या भूमिकेचे  नाव सोनसळा होते.   

4/6

तांदळा हा सिनेमा प्राजक्ता कोणतीही ऑडिशन न देता  मिळाला होता. प्राजक्ताच्या डान्स क्लासमध्ये एक मुलगा होतो जो सिनेमासाठी काम करत होता. 

5/6

एके दिवशी तो मुलगा प्राजक्ताला रस्त्यात भेटला आणि एकदम थबकला. तो तिला म्हणाला,तू तर अगदी आसावरी जोशींसारखीचं दिसते. या पत्त्यावर जा आणि  ऑडिशन देऊन ये किंवा नुसतचं तोंड दाखवून ये... 

6/6

यानंतर प्राजक्ता ऑडिशनसाठी  गेली आणि तिला  पाहताच ते म्हणाले, पुढच्या आठवड्यात वेळ आहे का? यावर ती म्हणाली, कॉलेज आहे पण  मी बंक करेल. अशा  रितीने प्राजक्ता माळीला पहिला  सिनेमा मिळाला.