PHOTO : 'व्हॅलेंटाइन डे'चं निमित्त साधत प्रथमेश परबचा साखरपुडा, प्रेमाच्या मुहूर्तावर नात्याला नवं नाव

गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीत लग्नाचे वारे सुरु झाले आहेत. लवकरच रकुल प्रीत सिंह देखील लग्न बंधनात अडकणार आहे. तर मराठी चित्रपटसृष्टीविषयी बोलायचे झाले तर स्वानंदी टीकेकर आणि आशिष कुलकर्णी, शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे, गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडूलकर हे कप्लस आहेत. आता एका नव्या जोडप्याची चर्चा रंगली आहे ती म्हणजे ‘टाईमपास’ फेम अभिनेता प्रथमेश परब. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्तानं त्या दोघांनी साखरपुडा केला. 

| Feb 15, 2024, 10:27 AM IST

 

 

1/7

प्रथमेश परब

प्रथमेश परबनं काल व्हॅलेंटाइन डेच्या निमित्तानं गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरशी साखरपुडा केला.

2/7

प्रथमेश आणि क्षितिजाचा लूक

प्रथमेशनं ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी परिधान केली आहे तर क्षितिजानं जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. 

3/7

रिलेशनशिप

गेल्या काही वर्षांपासून प्रथमेश आणि क्षितिजा हे रिलेशनशिपमध्ये होते. गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन्स डेला त्यांनी त्यांचं नातं अधिकृत केलं.   

4/7

व्हॅलेंटाईन्स डेचं महत्त्व

प्रथमेश आणि क्षितिजाच्या लव्ह स्टोरीमध्ये व्हॅलेंटाईन्स डेचं खास महत्त्व आहे. कारण त्यांचं बोलणं हे त्याच दिवशी सुरु झालं. त्या दोघांनी त्याच दिवशी रिलेशनशिपची कबूली देखील दिली.

5/7

कोण आहे क्षितिजा?

क्षितिजा ही एक अभिनेत्री आहे. त्याशिवाय ती मॉडेलिंग देखील करते आणि ती एक उत्तम लेखिका देखील आहे. 

6/7

‘टाईमपास’ च्या सेटवर पहिली भेट

बराचकाळ सोशल मीडियावर एकमेकांशी बोलत असले तरी त्या दोघांची पहिली भेट ही ‘टाईमपास’ च्या सेटवर झाली होती. 

7/7

पहिल्याच भेटीत क्षितिजानं विचारला प्रश्न?

पहिल्याच भेटीत क्षितिजानं प्रथमेशला प्रश्न विचारला की 'आपण रिलेशनशिपमध्ये येऊया का?' क्षितिजा आधीपासून आवडत असल्यानं प्रथमेशनं लगेच होकार दिला आणि त्यांच्या प्रवास सुरु झाला. (All Photo Credit : Prathamesh Parab and Kshitija Ghosalkar Instagram)