PHOTO: प्रेग्नेंसी टूरिझम असतं तरी काय? भारताच्या 'या' गावात गर्भवती होण्यासाठी येतात परदेशी महिला

Pregnancy Tourism Ladakh : भारतातील असं एक गाव आहे जे सोशल मीडियावर प्रकाशझोतात आलं आहे. कारण इथे परदेशी महिला गर्भवती होण्यासाठी येतात, असं म्हटलं जातं. कुठलं आहे गाव आणि काय आहे यामागील कारण जाणून घेऊयात. कारगिलपासून 70 किलोमीटर अंतरावर लडाखमध्ये एक गाव आहे, हे गाव आर्य व्हॅली म्हणून ओळखलं जातं. आर्य खोऱ्यात ब्रोक्पा जमातीचे लोक राहतात. हे लोक अलेक्झांडर द ग्रेटच्या सैन्याचे वंशज आहेत, असं मानलं जातं.

| Aug 27, 2024, 19:07 PM IST
1/5

आर्य व्हॅली

कारगिलपासून 70 किलोमीटर अंतरावर लडाखमध्ये एक गाव आहे, हे गाव आर्य व्हॅली म्हणून ओळखलं जातं. आर्य खोऱ्यात ब्रोक्पा जमातीचे लोक राहतात. हे लोक अलेक्झांडर द ग्रेटच्या सैन्याचे वंशज आहेत, असं मानलं जातं.

2/5

अलेक्झांडर द ग्रेटचे वंशज

अलेक्झांडर द ग्रेट जेव्हा भारत सोडून जात होता तेव्हा त्याच्या सैन्याचा काही भाग भारतात राहिला होता आणि त्यांचे वंशज अजूनही भारतात आहेत. त्याच्या सैन्याची उत्तम शरीरयष्टी, शारिरीक रचना असल्याने महिला आपलं मुलही तसंत व्हावं, यासाठी आर्य व्हॅलीमध्ये येतात.

3/5

अचतुंग बेबी इन सर्च ऑफ प्युरिटी

2007 मध्ये चित्रपट निर्माते संजीव सिवन यांचा 30 मिनिटांची डॉक्युमेंटरी अचतुंग बेबी इन सर्च ऑफ प्युरिटी प्रदर्शित झाला होता. यात एका जर्मन महिलेने कॅमेऱ्यात कबूल केलं होतं की, शुद्ध आर्यन स्पर्म्सच्या शोधात ती लडाखमध्ये आली होती.

4/5

डॉक्युमेंटरी

डॉक्युमेंटरीमध्ये ती महिला असंही म्हणाली की, मुलाला जन्म देण्यासाठी एवढ्या लांबचा प्रवास करणारी आर्यन ही पहिली जर्मन महिला नाही किंवा शेवटचीही नाही.

5/5

वैज्ञानिक पुरावे नाहीत

ब्रोक्पा दाव्यांसाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. केवळ लडाखी संस्कृतीपेक्षा ते वेगळे असल्यामुळे त्यांना शुद्ध आर्य मानलं जाऊ लागलं. ते केवळ त्यांच्या शारीरिक स्वरुपाच्या आधारे शुद्ध आर्य असल्याचा दावा करतात.