..अन् दारु प्यायलेला शोएब अख्तर माफी मागत सचिनच्या पायाशी पडला; सेहवागची हसून हसून लागली वाट

Shoaib Akhtar Fell At Sachin Tendulkar Feet: मैदानावर एकमेकांचे कट्टर वैरी असलेल्या या दोन क्रिकेटपटूंसंदर्भातील ही रंजक घटना एका निकटवर्तीयानेच सांगितली आहे. दोघांनी एका पार्टीमध्ये नेमकं काय केलं होतं आणि त्यानंतर काय घडलेलं हे जाणून घ्या...

Swapnil Ghangale | Aug 27, 2024, 15:42 PM IST
1/13

shoaibakhtarsachintendulkar

सचिन आणि शोएबचा हा रंजक किस्सा सचिनच्याच एका अत्यंत जवळच्या व्यक्तीने सांगितला आहे. नेमकं काय घडलेलं वाचा सविस्तर...

2/13

shoaibakhtarsachintendulkar

3/13

shoaibakhtarsachintendulkar

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा आजही अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारा क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो.  

4/13

shoaibakhtarsachintendulkar

तर दुसरीकडे पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर हा जगातील सर्वात वेगवान चेंडू फेकणार गोलंदाज म्हणून सर्वश्रृत आहे.  

5/13

shoaibakhtarsachintendulkar

या दोघांचा जेव्हा मैदानात सामना व्हायचा तेव्हा ती चाहत्यांसाठी पर्वणीच असायची. दोघे एकमेकांना तगडं आव्हान द्यायचे यात शंका नाही.  

6/13

shoaibakhtarsachintendulkar

मात्र फारच कमी लोकांना ठाऊक आहे की एकदा शोएब अख्तर चक्क सचिन तेंडुलकरचा पाठलाग करत करत त्याच्या पाया पडला होता आणि ते ही सर्वांसमोर!  

7/13

shoaibakhtarsachintendulkar

हा किस्सा भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने सांगितला होता. एका पार्टीत हा प्रकार घडल्याचं सेहवागने सांगितलं होतं.  

8/13

shoaibakhtarsachintendulkar

भारत आणि पाकिस्तानच्या संघासाठी लखनऊमध्ये एका पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं. शोएबचे तसे पार्टीमधील अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. मात्र या पार्टीत काहीतरी भलतं घडलं.

9/13

shoaibakhtarsachintendulkar

भारत आणि पाकिस्तानच्या संघासाठी आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीत शोएब अख्तरने थोडं जास्त मद्यपान केलं, असं सेहवागने सांगितलं.

10/13

shoaibakhtarsachintendulkar

मद्यधुंद अवस्थेत सचिनला उचलून घेण्याचा प्रयत्न करताना शोएब अख्तर सचिनसहीत सर्वांसमोर फ्लोअरवर पडला आणि त्याने साऱ्यांसमोर आपलं हसं करुन घेतलं.

11/13

shoaibakhtarsachintendulkar

कोणीतरी आपली तक्रार थेट बीसीसीआयकडे करेल मोठी कारवाई केली जाईल या भितीने शोएब त्यानंतर पूर्णवेळ सचिनच्या मागेपुढे त्याची माफी मागत फिरत होता.

12/13

shoaibakhtarsachintendulkar

अख्तर अगदी सचिनच्या पाया पडला आणि त्याने घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली तेव्हा सचिन आणि सेहवाग दोघेही हसू लागले.  

13/13

shoaibakhtarsachintendulkar

आजही हे तिघे एकत्र भेटतात तेव्हा या किस्स्यावर ते आवर्जून हसतात आणि त्याचा नवा पैलू पकडून आठवणींमध्ये रमतात हे विशेष!