'आम्ही कोणापेक्षा कमी नाही'; तेजस फायटर प्लेनमधून पंतप्रधान मोदींनी केले उड्डाण

PM Flies In Tejas : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला भेट दिली. यादरम्यान त्यांनी बंगळुरूमध्ये तेजस फायटर प्लेनमधून उड्डाण केले. पंतप्रधान मोदींनी आज या कंपनीचा आढावाही घेतला.

Nov 25, 2023, 13:21 PM IST
1/8

PM Flies In Tejas

2/8

PM Modi At HHL

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ला भेट देण्यासाठी पंतप्रधान मोदी शनिवारी बंगळुरूमध्ये दाखल झाले होते.

3/8

PM Modi

आज तेजसमध्ये उड्डाण करताना मी अभिमानाने सांगू शकतो की, आपल्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे आपण स्वावलंबनाच्या क्षेत्रात जगात कोणाहीपेक्षा कमी नाही. भारतीय वायुसेना, DRDO आणि HAL तसेच सर्व भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

4/8

tejas fighter jet

तेजस हे स्वदेशी हलके लढाऊ विमान आहे जे कोणत्याही हवामानात उडू शकते. हे दोन पायलट असलेले लढाऊ विमान आहे. याला ग्राउंड अटॅक एअरक्राफ्ट असेही म्हणतात.

5/8

made in india

पंतप्रधान मोदी संरक्षण उत्पादनांच्या स्वदेशी उत्पादनावर भर देत आहेत. सरकारने भारतात याच्या उत्पादनाला आणि त्यांच्या निर्यातीला कशा प्रकारे प्रोत्साहन दिले आहे यावर प्रकाश टाकला आहे.

6/8

PM Modi HAL

एचएएलला भेट देताना पंतप्रधान मोदींनी उत्पादन सुविधेचा आढावा घेतला. भारतीय हवाई दलाने अलीकडेच सरकारी मालकीच्या HAL ला 12 प्रगत Su-30MKI लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी निविदा जारी केली होती.

7/8

US Defense Company

दुसरीकडे अनेक देशांनी तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे. पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान यूएस डिफेन्स कंपनी GE एरोस्पेसने MK-II-तेजससाठी संयुक्तपणे इंजिन तयार करण्यासाठी एचएएल सोबत करार केला होता.

8/8

indian air force

दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या वर्षी एप्रिलमध्ये सांगितले होते की, 2022-2023 या आर्थिक वर्षात भारताच्या संरक्षण निर्यातीने 15,920 कोटी रुपयांचा उच्चांक गाठला आहे.