Interesting Facts: 'हे' आहेत 7 धोकादायक विमानतळ, लँडिंग करताना होते पायलटची कसरत

World's Dangerous Airports: विमानाबद्दल अनेक लोकांमध्ये आकर्षण असल्याचं पाहायला मिळतं. जगामध्ये असे काही विमानतळ आहेत, ज्यांची गणना ही चित्तथरारक विमानतळांमध्ये होतो. चला तर मग जाणून घेऊयात या विमानतळांबद्दल...

Oct 09, 2022, 16:44 PM IST
1/6

Princess Juliana International Airport

Princess Juliana International Airport: हे विमानतळ कॅरिबियन बेट सेंट मार्टिन शहरात आहे. त्याची धावपट्टी समुद्राच्या किनाऱ्याच्या अगदी मागे बांधलेली आहे. बोईंग 737 सारखी मोठी विमाने त्यावर उतरवता येत नाहीत. त्याच्या धावपट्टीची लांबी सुमारे 7500 फूट आहे. त्यावर उतरणारी किंवा टेकऑफ करणारी विमाने समुद्रकिनाऱ्यावर आंघोळ करणाऱ्या लोकांवरून जातात.

2/6

Paro International Airport

Paro International Airport: हे भूतानचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे सर्वात धोकादायक विमानतळांपैकी एक आहे. याठिकणी काही पायलट्सलाचं विमान उतरण्यासाठी परवानगी दिली जातं आणि लँडिंगसाठी विशेष प्रशिक्षण दिलं जातं. हे विमानतळ चारही बाजूंनी पर्वतांनी वेढलेलं आहे आणि ते समुद्रसपाटीपासून सुमारे 7364 फूट उंचीवर आहे. उतरण्यापूर्वी डोंगरावर बांधलेल्या घरांचीही काळजी घ्यावी लागते.

3/6

Cristiano Ronaldo International Airport

Cristiano Ronaldo International Airport: हे विमानतळ पोर्तुगालच्या सांताक्रूझ शहरात आहे. अटलांटिक महासागरात असल्यामुळे याठिकाणी वारे खूप जोरात वाहत असतात, त्यामुळे लँडिंग किंवा टेकऑफसाठी खूप धोका होऊ शकतो आहे. या विमानतळाला मदेइरा विमानतळ (Madeira Airport) आणि फंचल विमानतळ (Funchal Airport) म्हणूनही ओळखलं जातं.

4/6

Ronald Reagan Washington National Airport

Ronald Reagan Washington National Airport: या विमानतळाच्या आजूबाजूला अनेक उंच इमारती आहेत. यामध्ये व्हाईट हाऊसचा देखील समावेश आहे. टेकऑफ आणि लँडिंगच्या वेळी पायलटला शार्प टर्न घ्यावा लागतो, जेणेकरून विमान इमारतींना आदळण्यापासून वाचवता येऊ शकतं. टेकऑफनंतर काही सेकंदात पायलटला वळण घ्यावं लागतं.

5/6

Tenzing-Hillary Airport

Tenzing-Hillary Airport: हे विमानतळ नेपाळमध्ये आहे. या विमानतळावर विमान उतरवणं अत्यंत धोकादायक आहे. त्याची धावपट्टी सुमारे 460 मीटर असून आणि त्यात सुमारे 600 मीटर खोल खंदक आहे. त्यासोबतच, ते पर्वतांच्या मधोमध आहे. या विमानतळावर फक्त लहान विमानांनाच उतरण्याची परवानगी आहे. हे जगातील सर्वात धोकादायक विमानतळ देखील मानलं जातं. त्याला Lukla Airport अस देखील म्हणतात.

6/6

Kullu-Manali Airport

Kullu-Manali Airport: हा एक अतिशय छोटा विमानतळ आहे. चारही बाजूंनी उंच डोंगरांनी वेढलेलं आहे. त्याच्या धावपट्टीची लांबी 1000 मीटरपेक्षा कमी आहे. हे समुद्रसपाटीपासून सुमारे 2500 मीटर उंचीवर वसलेले आहे. जेव्हा याठिकाणी जोरदार वारे नसतात, तेव्हाच पायलट त्यावर उतरू शकतो किंवा टेकऑफ करू शकतो.