Pune Waterfall: पुण्यातील प्रसिद्ध मढे घाट धबधबा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी; दोरखंडाद्वारे धबधब्यात सोडण्यास मनाई

Madhe Waterfall in Pune: वेल्ह्यातील मढे घाटचा प्रसिद्ध धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो.  तोरणा किल्ल्याच्या परिसराचं निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र,  येथे जाण्यास आता मनाई करण्यात आली आहे.

Jul 20, 2023, 18:32 PM IST

Pune Madhe Ghat Waterfall : पुणे जिह्यातील वेल्हा तालुक्यातील मढे घाटातील प्रसिद्ध धबधबा अति प्रचंड वेगाने प्रवाहीत झाला आहे. तोरणा किल्लाच्या परिसरात असणा-या या धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होते. मढे घाट धबधबा परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आली आहे. 60 दिवस येथे जाण्यास पर्टकांना बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

1/10

मढे घाट धबधबा परिसरात प्रवाहित होणाऱ्या धबधब्यामध्ये पर्यटकांना दोरखंडाद्वारे खाली सोडले जाते. 

2/10

हा धबधबा लक्ष्मी धबधबा म्हणूनही ओळखला जातो.  समुद्रसपाटीपासून सुमारे 850 मीटर उंचीवर हा धबधबा आहे. तोरणा किल्ल्यामागे घनदाट जंगलात वसलेले आहे . या ठिकाणाहून रायगड किल्ला , लिंगाणा , वरंधा घाट आणि शिवथर घळ अशा विस्तीर्ण परिसराचे दर्शन घडते .

3/10

मढे घाट धबधबा हा  रायगड जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या पुण्याच्या दक्षिण पश्चिमेस ६२ किमी अंतरावर आणि तोरणा किल्ला , राजगड , रायगड किल्ला आणि भाटघर धरणाच्या मागील पाण्याच्या परिसरात आहे .

4/10

या आदेशाचा भंग करणाऱ्या आयोजक संस्था, सहभागी पर्यटकांवर भारतीय दंड. संहिता १९०८ कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि वन अधिनियमातील अनुषंगिक कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

5/10

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेता धबधब्याच्या ठिकाणी असे कार्य करण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे.

6/10

धबधबा परिसर पर्जन्यमानाचा प्रदेश असल्याने प्रवाहित होणाऱ्या धबधब्यामध्ये काही संस्था, आयोजक हे पर्यटकांना प्रवाही धबधब्याच्या वरील भागातून खाली दरीमध्ये २०० ते ३०० फुटांपर्यंत दोरखंडाद्वारे सोडत असल्याचे निदर्शनास आले आहे.

7/10

आदेशाचा भंग करणाऱ्या आयोजक संस्था, सहभागी पर्यटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

8/10

खबरदारी म्हणून उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र कचरे यांच्याकडून मढे घाट धबधबा परिसारत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

9/10

मढे घाट धबधबा परिसरात 60 दिवस प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. 

10/10

काही संस्था ॲडव्हेंचर खेळाच्या नावाखाली अशा प्रकारे बेकायदेशीरपणे मढे घाट धबधब्यावर दोरखंडाद्वारे धोकादायक पद्धतीने खाली सोडत असल्याचं निदर्शनास आले.