13 हजार रुपयांना खरेदी केलेला मुखवटा 36 कोटींना विकला; असं आहे तरी काय यात?

एका जोडप्याने आर्ट गॅलरीला विकलेल्या मास्कवर तब्बल 36 कोटींची बोली लागली. 

Oct 12, 2023, 19:56 PM IST

 African Face Mask : आफ्रिकेतील एक मुखवटा सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण  13 हजार रुपयांना खरेदी केलेला हा मुखवटा 36 कोटींना विकला गेला आहे. हा एक पारंपारिक मुखवटा आहे. 

1/7

फ्रान्समधील निम्सचे रहिवासी असलेल्या 80 वर्षीय जोडप्याला हा मुखवटा सापडला होता. या जोडप्याने एका आर्ट गॅलरीला हा मुखवटा 13 हजार रुपयांना विकला. 

2/7

जोडप्याच्या तक्रारीनंतर कोर्टाने या मुखवट्याच्या लिलावावर स्थगिती आणली आहे.   

3/7

हा मुखवटा लग्न समारंभ तसेच अत्यंविधी तसेच इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये परिधान केला जातो. 

4/7

हा मुखवटा 19 व्या शतकातील असल्याचा दावा केला जात आहे.   

5/7

 हा फ्रेंच मुखवटा दुर्मिळ आहे. आर्ट डीलरला याबाबत माहित होते मात्र, कमी किंमतीत मुखवटा खरेदी करुन आमची फसवणुक केल्याचा दावा जोडप्याने केला आहे. 

6/7

या मास्कची  36 कोटींना विक्री झाल्याचे समजताच जोडप्याने आर्ट डिलर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.   

7/7

एका आर्ट डीलरने या आफ्रिकन मास्कचा लिलाव केला. यानंतर हा मास्क तब्बल   36 कोटींना विकला गेला.