राधिकाचा प्रेमाबद्दल खुलासा, 'अनेकांवर करते प्रेम'

 अभिनेत्री राधिका आपटेने प्रेमा बद्दल असलेले तिचे मत मांडले आहे. 

Jul 03, 2019, 14:33 PM IST

मुंबई : बॉलिवूडमंडळी नेहमीच त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांनी पोस्ट केलेले फोटो काही क्षणातचं व्हायरल होतात. प्रत्येक चाहत्याला कलाकारांच्या बाबतीत अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असते, आणि जर ती बातमी त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल असेल तर चाहत्यांच्या मनातील उत्कंठा अधिकच वाढते. 'पॅडमॅन', 'मांझी: द माउंटन मॅन' चिपटाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री राधिका आपटेने प्रेमा बद्दल असलेले तिचे मत मांडले आहे. 

1/5

प्रेमाबद्दलचे राधिकाचे विचार

प्रेमाबद्दलचे राधिकाचे विचार

सुत्रसंचालक नेहा धुपियाने राधिकाला इतरांकडे आकर्षित होण्याबद्दल विचारले असता, ती म्हणाली, 'नक्कीच तुम्ही इतरांकडे आकर्षित होऊ शकता, त्यासाठी तुम्हाला अभिनेता किंवा अभिनेत्री असण्याची गरजच नाही.'

2/5

प्रेमाबद्दलचे राधिकाचे विचार

प्रेमाबद्दलचे राधिकाचे विचार

राधिका म्हणते की, 'आयुष्यात तुम्ही अनेक लोकांना भेटता, आणि काही लोकं प्रचंड अदभूत असतात. तुम्ही त्यांच्याकडे नकळत आकर्षित होता. ते कदाचित शारीरिक आकर्षण देखील असू शकतं किंवा त्या व्यक्ती प्रती आदराची भावना देखील असू शकते. ही भावना मनाला अत्यंत समाधान देणारी असते.'   

3/5

प्रेमाबद्दलचे राधिकाचे विचार

प्रेमाबद्दलचे राधिकाचे विचार

आपण जसजसे मोठे होत जातो, त्याचप्रमाणे आपल्या भावनांमध्ये देखील बदल होत राहतात, ही बाब तिने स्पष्ट केली.

4/5

प्रेमाबद्दलचे राधिकाचे विचार

प्रेमाबद्दलचे राधिकाचे विचार

'मी अनेक व्यक्तींसह प्रेम करण्यात विश्वास ठेवते. एकाच वेळी आपण अनेक गोष्टींच्या सुद्धा प्रेमात पडतो. त्यापैकी नृत्य आणि अभिनयावर माझे फार प्रेम आहे', असंही राधिका म्हणाली. 

5/5

प्रेमाबद्दलचे राधिकाचे विचार

प्रेमाबद्दलचे राधिकाचे विचार

'मी खूप भाग्यशाली आहे की, मला बेनडिक्ट टेलर सारखा पती भेटला आहे.' राधिकाच्या अभिनय कौशल्याला आणि तिच्या सौंदर्याच्या चर्चा नेहमीच चाहत्यांमध्ये रंगत असतात.