दंडावर बिल्ला, डोक्यावर बॅग अन्...; दिल्ली रेल्वे स्टेशनवरील राहुल गांधींचे फोटो पाहिलेत का?

Rahul Gandhi Meets Coolies: लोकसभेमध्ये महिला आरक्षणासंदर्भात आपलं मतप्रदर्शन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी अचानक रेल्वे स्टेशनवर पोहचले. राहुल गांधींनी या ठिकाणी हमालांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. पाहूयात या भेटीतील काही खास क्षण...

| Sep 21, 2023, 12:53 PM IST
1/9

Rahul Gandhi Meets Coolies

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज देशाची राजधानी नवी दिल्लीमधील आनंद विहार रेल्वे स्टेशनवर पोहचले. या ठिकाणी त्यांनी रेल्वेच्या हमालांची भेट घेतली. 

2/9

Rahul Gandhi Meets Coolies

अगदी हमाला बांधतात तो बिल्लाही राहुल गांधींनी आपल्या दंडावर बांधून घेतला.

3/9

Rahul Gandhi Meets Coolies

काँग्रेसने राहुल गांधी आणि हमालांच्या या भेटीचे फोटो शेअर केले असून सोशल मीडियावर ते चर्चा विषय ठरत आहेत.

4/9

Rahul Gandhi Meets Coolies

राहुल गांधींनी या वेळेस प्रवाशांचं सामान डोक्यावरुन वाहून नेलं.

5/9

Rahul Gandhi Meets Coolies

काँग्रेसने राहुल गांधींच्या या हमाल भेटीचे फोटो शेअर करताना, "जननायक राहुल गांधी आज दिल्लीमधील आनंद विहार रेल्वे स्टेशनवर हमालांना भेटले. काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये काही हमालांनी राहुल गांधींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. आज राहुल गांधी या हमालांना भेटायला गेले. त्यांच्या तक्रारी आणि म्हणणं ऐकून घेतलं. भारत जोडो यात्रा सुरु आहे," असं कॅप्शन दिलं आहे.

6/9

Rahul Gandhi Meets Coolies

मागील काही काळापासून राहुल गांधी सातत्याने समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांना भेटत आहेत. यापूर्वी त्यांनी शेतकरी, मोटरसायकल मेकॅनिक्सची भेट घेतली आहे. आज ते हमालांच्या भेटीसाठी पोहोचले. 

7/9

Rahul Gandhi Meets Coolies

राहुल गांधींच्या अवतीभोवती सर्व हमाल घोळका करुन बसले होते. राहुल गांधींनी या हमालांच्या समस्यांबरोबर ते कसं आणि काय काय काम करतात, त्यांची दिनचर्या कशी असते याबद्दलची माहिती घेतली.

8/9

Rahul Gandhi Meets Coolies

राहुल गांधींबरोबर सेल्फी काढण्याचा मोह अनेक हमालांना आवरला नाही. राहुल गांधींनीही छान हसत कॅमेराकडे पाहत सेल्फीसाठी पोज दिली.

9/9

Rahul Gandhi Meets Coolies

हमाल कोणत्या अवस्थेत आणि कसे राहतात याची विचारपूसही राहुल गांधी यांनी अगदी आपुलकीने केली. हमालांच्या सर्व समस्या त्यांनी ऐकून घेत त्या सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करु असं आश्वासन दिलं.