प्रचंड वेगाने वाहणाऱ्या नदीवर झुलता पुल; धबधब्यापर्यंत जाणारा महाराष्ट्रातील सर्वात थरारक मार्ग

महाराष्ट्रातील या धबधब्यावर पोचण्यासाठी नदीवर बांधण्यात आलेला झुलता पुल पार करावा लागतो.

| Jul 28, 2024, 23:06 PM IST

Raigad Devkund Waterfall :  महाराष्ट्रातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे तो रायगडमधील देवकुंड धबधबा. हा धबधबा जितका सुंदर आहे तितकाच या धबधब्यावर जाणारा मार्ग थरारक आहे. खाली प्रचंड वेगाने वाहणारी नदी आणि त्यावर झुलता लाकडी पुल. या पुलावरुनच धबधब्यापर्यंत जाण्याचा मार्ग आहे. यामुळेच धबधब्यापर्यंत जाणारा महाराष्ट्रातील सर्वात थरारक मार्ग आहे. 

1/7

रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधबा हा महाराष्ट्रातील लोकप्रिय धबधबा आहे. या धबधब्याप्रमाणेच येथे असलेल्या  नदीवरील झुलता पुल देखील पर्यटकांना आकर्षित करतो.

2/7

देवकुंड धबधबा जितका सुंदर आहे तितकाच तो धोकादायक देखील आहे. यामुळे येथे निसर्गपर्यटनाचा आनंद लुटताना खबरदारी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे.  

3/7

 या धबधब्याची उंची साधारणत: 250 फूट. हा धबधबा सह्याद्रीच्या पर्वत रांगांनी वेढलेला आहे. 

4/7

कुंडलिका नदी पासून उगम पावणाऱ्या तीन धबधब्यापैकी देवकुंड हा एक धबधबा आहे. 

5/7

 रायगड जिल्यातील पाटणूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत देवकुंड धबधबा आहे. भिरा गावातून दोन तास ट्रेक केल्यानंतर धबधब्यावर पोहोचता येते. 

6/7

हा धबधबा मुंबई पासून सुमारे 130 किमी अंतरावर असून या प्रवासासाठी चार तास लागतात. तर, पुण्यापासून हा 100 किमी अंतरावर आहे. पुण्यातून 3 तासात येथे पोहचता येते.

7/7

जंगलातून पायपीट केल्यानंतर नदीवर असलेल्या या झुलत्या पुलावरुनच धबधब्यापर्यंत जाणारा मार्ग आहे. हा पुल पार करणे म्हणजे अत्यंत थरारक अनुभव आहे.