अनंत अंबानी-राधिकाच्या लग्नात पाहुण्यांच्या हातात वेगवेगळ्या रंगाचे बॅण्ड का होते? कारण आलं समोर

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नात (Anant Ambani Marriage) क्यूआर कोड प्रवेश, कलर-कोडेड रिस्टबँड, हाय-प्रोफाइल पाहुणे आणि व्यापक वैद्यकीय तयारी होती,   

| Jul 28, 2024, 20:03 PM IST

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नात (Anant Ambani Marriage) क्यूआर कोड प्रवेश, कलर-कोडेड रिस्टबँड, हाय-प्रोफाइल पाहुणे आणि व्यापक वैद्यकीय तयारी होती, 

 

1/11

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा नुकतात पार पडला. मुंबईत तीन दिवस हा विवाहसोहळा आणि कार्यक्रम सुरु होते.   

2/11

दरम्यान लग्नात आलेल्या पाहुण्यांना आतमधील वेगवेगळ्या झोनमध्ये प्रवेश करण्यासाठी खास क्यूआर कोड आणि कलर-कोडेड रिस्टबँडची सोय करण्यात आली आहे. लग्नामध्ये कडक सुरक्षाव्यवस्था असल्याने ही सोय होती.   

3/11

12 जुलै रोजी जगभरातील सेलिब्रिटी, उद्योजक, क्रिकेटपटू, बॉलिवूड सेलिब्र्टी आणि राजकारणी उपस्थित असलेल्या विवाह सोहळ्याने उत्सवाची सुरुवात झाली. 13 जुलै रोजी 'शुभ आशीर्वाद' सोहळा पार पडला, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. 14 जुलै रोजी 'मंगल उत्सव' होता ज्यामध्ये कर्मचारी आणि व्यावसायिक भागीदारांसह इतर पाहुणे उपस्थित होते.   

4/11

लग्नात प्रवेश करण्यासाठी खास क्यूआर कोड देण्यात आले होते. हे कोड मोबाईलवर आले होते. तसंच आतमध्ये वेगवेगळ्या झोनमध्ये प्रवेश कऱण्यासाठी कलर कोडेड रिस्टँबड होते. लग्नात वेगवेगळ्या टप्प्यातील सुरक्षाव्यवस्था, आपातकालीन योजना आणि वैद्यकीय व्यवस्थेचं नियोजन कऱण्यात आलं होतं.   

5/11

लग्नासाठी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या होत्या. सर्वात एक्सक्लुझिव्ह पत्रिकेवर चांदीची छोटी मंदिरं होती.  

6/11

प्रत्येक सोहळ्यासाठी वेगळी निमंत्रण पत्रिका होती. ज्यामधील एक चांदीचं होतं आणि त्यावर प्राचीन मंदिराच्या मुख्य द्वारासारखं चिन्ह होतं. त्यात अनंत आणि राधिकासाठी 'एआर' आद्याक्षरे असलेले भरतकाम केलेले कापड, एक निळी शाल आणि अधिक भेटवस्तूंनी भरलेली चांदीची पेटी यासारख्या अनेक वस्तूंचा समावेश होता.  

7/11

सर्वात सोपे आमंत्रण लॅपटॉपच्या आकाराच्या बॉक्समध्ये तीन देवांच्या चांदीच्या मूर्ती आणि निमंत्रण पत्रिका होती. पाहुण्यांना जीमेल किंवा गुगल फॉर्मवरुन त्यांच्या उपस्थितीची खात्री करायची  होती. ज्यांनी आपण उपस्थित असू असं कळवलं त्यांना एक मेसेज आला होता. ज्यामध्ये लिहिण्यात आलं होतं की, "आम्हाला तुमचं उत्तर मिळालं असून, स्वागतासाठी वाट पाहू. कार्यक्रमाच्या6 तास आधा तुमच्याशी क्यूआर कोड शेअर केला जाईल".  

8/11

मोबाइल फोन आणि ईमेलवर पाठवण्यात आलेले क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर पाहुण्यांना प्रवेश देण्यात आला. यानंतर पाहुण्यांच्या हातावर वेगवेगळ्या रंगाचे बँड बांधले गेले होते ज्यामध्ये रंगानुसार वेगवेगळ्या झोनमध्ये प्रवेश दिला होता.  

9/11

अनेक चित्रपट अभिनेते आणि क्रिकेटपटू तसंच कोरियन इलेक्ट्रॉनिक दिग्गज कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे अध्यक्ष ली जे-योंग आणि त्यांच्या पत्नीने लग्नाच्या दिवशी मनगटावर गुलाबी आणि शनिवारी लाल रंगाचा बँड घातला होता. कर्मचारी, सुरक्षा आणि सेवा कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या रंगाचे बँड बांधले होते.   

10/11

याशिवाय विवाहस्थळी अग्निशमन आणि वैद्यकीय व्यवस्थाही तत्पर ठेवण्यात आली होती. वैद्यकीय सुविधेत डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी सर्व आपत्कालीन उपकरणांसह घटनास्थळी होते. कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय आणीबाणीला सामोरे जाण्यासाठी रुग्णवाहिकांनी जवळच्या रुग्णालयांचे मार्ग स्पष्टपणे निर्धारित केले होते.  

11/11

पीटीआयच्या अहवालानुसार, QR कोड पाठवला जाणे आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दरम्यानचा वेळ या वेळी कमी करण्यात आला. याचं कारण मागील वेळी अंबानींच्या लग्नात निमंत्रण नसणारेही दाखल झाले होते.