Train Ticket Booking: गावी जाताना कन्फर्म तिकीट हवीय? मग ही सोपी ट्रिक वापरा
सध्या परीक्षांचा काळ सुरु असून त्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडणार आहेत. त्यामुळे अनेकांनी गावाकडे जाण्याचा प्लॅन आखला असेल. प्रवासासाठी सर्वात स्वतः पर्याय म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं. पण रेल्वेची कन्फर्म तिकीट नसल्याने अनेकांना गावी जाताना अनेकांचा हिरमोड होतो.
जर तुम्ही गावी जाताना रेल्वेने जाण्याचा प्लॅन आखणार असाल आणि तुम्हाला कन्फर्म तिकीट हवं असेल तर आता काळजी करण्याचं कारण नाही. सोपी ट्रिक्स वापरुन तुम्हाला कन्फर्म तिकिटे सहज मिळू शकते. यासाठी तुम्हाला IRCTC मास्टर लिस्टद्वारे तिकीट बुकिंग करावं लागेल.