वादळाने मुंबईची दैना! घाटकोपरमध्ये होर्डिंग तर वडाळयात लोखंडी टॉवर कोसळला... रेल्वेही विस्कळीत

Mumbai Rain : मुंबईत दुपारच्या सुमारस अचानक आलेल्या वादळी वारे आणि पावसाने दैना उडवली.  वादळी वाऱ्याने घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं..अनेक जण होर्डिंगखाली अडकल्याची भीती आहे.  तर वडाळ्यात 3 मजली उंच लोखंडी ढाचा कोसळला. पावसामुळे मध्य आणि पश्चिम मार्गावरची रेल्वे सेवा विस्कळीत झाली. यामुळे ऐन गर्दीच्यावेळी मुंबईकरांचे हाल झाले.

| May 13, 2024, 19:33 PM IST
1/7

मुंबईत जोरदार वाऱ्यामुळे घाटकोपर भागात मोठी दुर्घटना घडली. वादळी वाऱ्यामुळे भलामोठा होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळला. या होर्डिंगखाली 100 हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. यात 35 जणं जखमी झाल असून जखमींना राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. 

2/7

अवकाळी पावसानं मुंबईला चांगलंच झोडपलंय. जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागात दुर्घटना घडल्याचं पहायला मिळतंय. वडाळ्यामध्ये लोखंडी टॉवर कार पार्किंगवर कोसळलंय. यामध्ये 12 ते 13 कारचं नुकसान झाल्याचं समजतंय. NDRFची टीम घटनास्थळी पोहोचलीये आणि हा लोखंडी टॉवर हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरूये. 

3/7

मुंबईत पावसामुळे दुर्घटना घडल्या आहेत. पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झालाय. नवी मुंबई महानगरपालिकेची बस आणि चारचाकी गाडीचा अपघात झालाय. यात एक महिला जखमी झाली असून अपघातामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

4/7

मुंबईत अवकाळी पावसामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा कोलमडली होती.  धीम्या डाऊन मार्गावरील वाहतूक माटुंग्यापासून जलद मार्गावर वळवण्यात आली. दुसरीकडे ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान ओवर हेड वायर तुटली होती. त्याच्या दुरुस्तीसाठी ठाण्यातील ज्ञानसाधना कॉलेजच्या समोर  ठाणे रेल्वे स्थानकासमोर युद्ध पातळीवर काम सुरुय. 

5/7

मुंबईतल्या वीर माता जिजाबाई भोसले उद्यान पुलावर अपघात झाल्यामुळे वाहतूक ही वळवण्यात आली आहे. भायखळावरून परळच्या दिशेने जाणाऱ्या पुलावर ट्रक पलटी झाल्यामुळे वाहतूक वळवण्यात आली होती.

6/7

नवी मुंबईत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला. नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. नवी मुंबई शहराला अवकाळी पावसानं झोडपलं. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. तर ऐरोलीतल्या सेक्टर 5 मध्ये जोरदार वाऱ्यामुळे रस्त्यावर झाड कोसळलं. 

7/7

मुंबई आणि परीसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे जीथे दूर्घटना घडल्या आहे. तीथे तात्काळ मदत यंत्रणा पाठवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिॅदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.