PHOTO : अबब! पावसाळ्यात पाण्याबरोबर हिरे वाहून आणते 'ही' नदी, आतापर्यंत अनेक जण झालेत कोट्यधीश

भारतात नदीला पवित्र मानलं जातं. या शहरातील नदीने रातोरात अनेकांना मालामाल केलं. कारण पावसाळ्या या नदीच्या पाण्याबरोबर हिरे वाहून येतात. 

Aug 31, 2024, 13:30 PM IST
1/7

भारतातील एक नदी अशी आहे, जी तुम्हाला रातोरात श्रीमंत करु शकते. या नदीत छोटे मोठे दगड आणि रेतीसह तुम्हाला हिरा सापडली. हो अगदी खरंय...असं म्हणतात या नदीत हिरे सापडतात. काय आहे या नदीतील हिऱ्यांचं रहस्य जाणून घेऊयात.   

2/7

पाण्यासोबत हिरे देणारी ही नदी भारतातील मध्य प्रदेशात बुंदेलखंडच्या पन्ना जिल्ह्यातील आहे. अजयगडमध्ये उगम पावणाऱ्या या नदीचं नाव हे रुंझ नदी असं आहे. पावळ्यात या नदीला पूर येतो आणि त्या पुराच्या पाण्यासोबत हिरे मिळतात. त्यामुळे दरवर्षी असंख्य लोक नदीकाठी खडी हिऱ्याचा शोधात येतात.     

3/7

या हिरा असणाऱ्या नदीचा शोध असा लागला की, 2 वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याला 72 कॅरेटचा हिरा या नदीत सापडला आणि ही बातमी अख्खा शहरात वाऱ्यासारखी पसरली. हजारो लोक श्रीमंत होण्यासाठी नदीवर आली खरी पण ही नदी वनविभाग हद्दीत येते. त्यामुळे या लोकांना नदीजवळ जाण्यास मज्जाव करण्यात आला. पण तरीही लोक वनविभागाच्या नजरा चुकवित आपलं नशीब आजमावण्यासाठी नदीवर येतात.   

4/7

हिरा सदा के लिए अशी जाहिरात आपण ऐकली आहे. पण नदीत हा मौल्यवान आणि श्रीमंत करणारा हिरा शोधण्यासाठी खूप घाम गाळावा लागतो. लोक नदीकाठी फावडे, संबळ, तसला आणि जाळीच्या टोपल्या घेऊन हिऱ्यांच्या शोधात अहोरात्र बसली असतात. अगदी आजही या नदीकाठी तुम्हाला अनेक जण श्रीमंत होण्यासाठी हिरा शोध घेत असताना दिसून येतात.  

5/7

नशिबात हिरा असला की जाळीदार टोपलीत तो गवसतो. पण असे असंख्य लोक असतात ते कितीही मेहनत केली तरी त्यांना हिरा मिळत नाही.   

6/7

सध्या या नदीवर रुंझ धरण बांधण्याच काम सुरु आहे. हे काम आतापर्यंत 60 टक्के झालंय. हे धरण पूर्ण झाल्यानंतर नदीचा परिसर शेकडो फूट खोल पाण्यात बुडणार आहे. त्यामुळे भविष्यात इथे हिराच्या शोधात लोकांचे येणं बंद होईल.   

7/7

हिऱ्याचा इतिहास बुंदेलखंडमधील पन्ना गावात तब्बल 300 वर्षं जुना आहे. वर्षांपूर्वीपासून इथे हिऱ्याच्या खाणी सापडल्या आहेत. महाराज छत्रसाल यांच्या काळापासून स्वामी प्राणनाथांच्या आशीर्वादाने इथे हिरे उत्खननाची पहिल्यांदाच करण्यात आली असं इतिहास अभ्यासक सांगतात. रातोरात कोट्यधीक्ष होण्यासाठी नदीच्या आसपासची जमिनी भाडेतत्वावर घेतात आणि त्यावर श्रीमंत होण्यासाठी हिऱ्यांचा शोध घेतात.