डिंपलला घटस्फोट न देता राजेश खन्ना 'या' अभिनेत्रीसोबत लिव्ह इनमध्ये राहायचे, अभिनेत्याच्या मृत्यूनंतर मालमत्तेतील हक्कावरून पेटला वाद

डिंपल कपाडियानंतर राजेश खन्ना यांचे नाव अंजू महेंद्रू आणि अनिता अडवाणी यांच्यासोबत जोडले गेले. दोघेही अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

| Aug 31, 2024, 11:37 AM IST
1/7

अनेकांना माहितीय की, राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांनी अनेक वर्ष वेगळे राहूनही त्यांनी घटस्फोट घेतला नव्हता. डिंपल कपाडिया दोन मुलींसह आईकडे निघून गेली होती. तर राजेश खन्नाच नाव त्यावेळी दोन अभिनेत्रींशी जोडलं गेलं. अंजू महेंद्रू आणि अनिता अडवाणी सोबत अफेयर असल्याच बोलं गेलं. 

2/7

राजेश खन्ना यांनी 8 जुलै 2012 ला अखेरचा श्वास घेतला. बहुतेक लोकांना माहित आहे की, ते त्यांच्या आयुष्यातील शेवटच काळातही एकटे नव्हते. ते अभिनेत्री अनिता आडवाणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.   

3/7

मीडिया रिपोर्टनुसार, राजेश खन्ना आणि अनिता 2006 पासून काकांच्या आशीर्वाद बंगल्यात राहत होते. यादरम्यान अनिताने काकांच्या कुटुंबावर अनेक दावे केले आणि त्यांच्यावर आरोपही केले. TOI ला दिलेल्या मुलाखतीत अनिता म्हणाली होती की, त्यांच्या कुटुंबाशी राजेश खन्ना यांच्याशी काहीही संबंध नाही, राजेश यांना स्वतःपुरतेच राहणे आवडायचे. 

4/7

राजेश खन्ना यांचा मृत्यू झाला तेव्हाही अनिता त्यांच्यासोबत होती. अनितानेही अभिनेत्याच्या मालमत्तेत आपला हक्क मागितला होता. पत्नीचा हक्क मिळवण्यासाठी तिने खूप गदारोळ माजवला होता, इतका की तिने स्वतःला राजेश खन्नाची सरोगेट पत्नी म्हणवून घ्यायला सुरुवात केली होती. 

5/7

तिने दावा केला की ती राजेश खन्ना यांच्यासाठी करवा चौथ उपवास करायच्या . राजेश खन्ना यांची पत्नी होण्याचा अधिकार तिला मिळावा यासाठी तिनेखूप प्रयत्न केले, पण तसं झालं नाही. अनिताने डिंपल कपाडिया आणि ट्विंकल खन्ना यांच्यावरही हिंसाचाराचे आरोप केले होते. मात्र, त्यांचा युक्तिवाद कोणीही ऐकून घेतला नाही.   

6/7

अनिताने मुलाखतीत राजेश खन्नासोबतच्या तिच्या कौटुंबिक नात्याबद्दलही सांगितलं. काकांचा अक्षय कुमार किंवा इतर कोणाशीही संबंध नाही, असे ते म्हणाले. अनिताने 2011 मध्ये राजेश खन्ना यांच्या घरी पूजा आयोजित केली होती, तेव्हा ट्विंकल खन्ना आणि अक्षय तिथे आले होते आणि त्यानंतर ते एकमेकांना भेटायला लागले.

7/7

तिने आशीर्वाद बंगल्यावरही आपला हक्क सांगितला होता. पण या घरावर राजेश खन्ना यांच्या मुली  ट्विंकल आणि रिंकीचा हक्का होता. पुढे त्यांनी हा बंगला ऑलकार्गो लॉजिस्टिक लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि एमडी शक्ती शेट्टी यांना विकला. राजेश खन्ना यांनी त्यांच्या आशीर्वाद चित्रपटाच्या यशानंतर ते विकत घेतले. एके काळी सर्वात यशस्वी अभिनेते राजेंद्र कुमार यांनी त्यांना हा बंगला 1970 मध्ये 3.5 लाख रुपयांना विकला होता. पाली हिल्समध्ये त्यांनी बंगला बांधला होता.