अखेर 'कारगिलचा हिरो' निवृत्त झाला!
जोधपूर : भारतीय हवाई सेनेचं लढाऊ विमान आणि कारगिलाचा हिरो म्हणून ओळखलं जाणारं 'मिग २७' आज अखेर हवाई दलातून निवृत्त झालं. राजस्थानच्या जोधपूर एअरबेसमध्ये ७ लढाऊ विमानांनी आपलं अखेरचं उड्डाण घेतलं. या दरम्यान, वायुसेनेच्या अनेक अधिकाऱ्यांनी मिग २७ ला अखेरची सलामी दिली. २९ स्क्वॉड्रन 'स्कॉर्पिअस'ला या लढाऊ विमानांना गुड बाय म्हणण्याचा बहुमान मिळाला.
मिग २७ नं गेली तीन दशकं भारताच्या वायुसेनेत आपली सेवा बजावली. १९८५ मध्ये ही विमानं वायुदलात सामील करण्यात आली होती. मिग २७ ची जागा आता वायुदलात मिग २१ घेणार आहे.