क्रिकेटमधील भाऊ बहिणीच्या 5 जोड्या, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळवलं नाव

रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या नात्याचा सण आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्व असून यादिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते. यादिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते तर भाऊ सुद्धा आपल्या बहिणीची रक्षा करण्याचं वचन देतो. तसेच बहिणीला भेटवस्तू सुद्धा देतो. क्रिकेटमध्ये सुद्धा अशा काही भाऊ बहिणीच्या जोड्या आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव केले. तेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भाऊ बहिणीच्या या जोड्यांविषयी जाणून घेऊयात. 

Aug 19, 2024, 15:26 PM IST
1/6

पीटर मॅकग्लाशन आणि सारा मॅकग्लाशन :

पीटर मॅकग्लाशन आणि सारा मॅकग्लाशन : सारा मॅकग्लाशनने 2002 ते 2016 या दरम्यान न्यूझीलंडसाठी 200 हुन अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात 2 टेस्ट तर 134 वनडे आणि 76 टी 20 सामन्यांचा समावेश आहे. तिच्या नावावर एकूण 3500 धावा आहेत. पीटर मॅकग्लाशनने चार वनडे आणि 11 टी 20 मध्ये न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं.   

2/6

नाथन एस्टल आणि लिसा एस्टल :

 नाथन एस्टल हा न्यूझीलंडचा प्रसिद्ध क्रिकेटर असून तो न्यूझीलंडच्या इतिहासातील दिग्गज फलंदाजांपैकी एक आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये दुहेरी शतक ठोकण्याचा रेकॉर्ड नाथन एस्टलच्या नावावर आहे. नाथनची बहीण लिसा एस्टलही न्यूझीलंडकडून एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळली आहे. 

3/6

हॅरी टेक्टर आणि एलिस टेक्टर :

हॅरी टेक्टर आयर्लंडच्या सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. 45 सामन्यात त्याने 50 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर वनडे रँकिंगमध्ये तो चौथ्या नंबरवर आहे. तीन दिवसांपूर्वीच हॅरीची बहीण एलिस टेक्टरने श्रीलंकेच्या विरुद्ध आयर्लंड टीमकडून वनडे क्रिकेटमध्ये डेब्यू केला. 

4/6

एड जॉयस, डॉम जॉयस, इसोबेल जॉयस आणि सेसेलिया जॉयस :

 आयरलँडच्या जॉयस फॅमिलीत एकूण चार आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आहेत. एड जॉयस हा इंग्लंड टीमसाठी सुद्धा क्रिकेट खेळला आहे. तर डॉमला आयरलँडसाठी तीन वनडे खेळण्याची संधी मिळाली. या दोघांच्या बहिणी इसोबेल आणि सेसेलिया यांनी सुद्धा अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. इसोबेल  देशाच्या टीमकडून एक टेस्ट सामना आणि 79 वनडे तसेच 55 टी 20 सामने खेळले आहेत. तर सेसेलियाजवळ 100  आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचा अनुभव आहे. 

5/6

​विल सदरलँड आणि एनाबेल सदरलँड :

 एनाबेल सदरलँड ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाची प्रमुख ऑलराउंडर असून तिने नुकतेच एका सामन्यात दुहेरी शतक ठोकले. गोलंदाजीमध्ये सुद्धा सदरलँडच्या नावावर 59 विकेट्स आहेत. एनाबेल सदरलँड ही भारतात होणाऱ्या महिला प्रीमियर लीगमध्ये सुद्धा खेळते. एनाबेलचा भाऊ विल सदरलँडला यावर्षी ऑस्ट्रेलियासाठी दोन वनडे खेळण्याची संधी मिळाली होती. त्याच्या या सामन्यात 18 धावा केल्या तसेच 2 विकेट्स मिळवले होते. 

6/6

स्मृती मानधना आणि श्रवण मानधना :

टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधना ही एक स्टार क्रिकेटर असून तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं नावं उंचावलं आहे. स्मृती हीचा भाऊ देखील क्रिकेटपटू होता त्याने महाराष्ट्र राज्याच्या क्रिकेट टीमचे प्रतिनिधित्व केले होते. आपल्या भावाला महाराष्ट्र राज्य अंडर-16 स्पर्धेत खेळताना पाहून स्मृतीला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली.  श्रवण मानधना याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नसले तरी स्मृती ही क्रिकेट विश्वात भारताचं उंचावत आहे.