रणबीर कपूर आणि आलिया भट लवकरच विवाहबंधनात अडकणार?

Dec 24, 2020, 21:55 PM IST
1/4

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 

2/4

रणबीर आणि आलियाच्या रिलेशनशीपची बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चा आहे. खरं तर या दोघांना यावर्षीच लग्न करायचं होतं. पण दोघांच्या लग्नात कोरोनानं खोडा घातला. अशी माहिती पुढे आली आहे. 

3/4

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. कोरोना नसता तर यावर्षीच लग्न झालं असतं असं रणबीरनं एका मुलाखतीत म्हटलं आहे. 

4/4

गेल्या काही काळापासून रणबीर आणि आलिया रिलेशिनशिपमध्ये होते. दोघं या नात्याबद्दल फारसे बोलले नव्हते. मात्र हे दोघं पार्ट्यांना एकत्र जायचे. आता पुढच्या वर्षात आलिया आणि रणबीरचा बँड, बाजा वाजणार अशी शक्यता आहे