Babasaheb Purandare 100th Birthday : शिवगाथा जगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंना रांगोळीच्या माध्यमातून मानाचा मुजरा

Jul 29, 2021, 09:55 AM IST
1/5

 शिवशाहीर अशी ओळख असणाऱ्या आणि शिवगाथा खऱ्या अर्थानं जगलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांनी वयाची 99 वर्षे पूर्ण केली असून शंभराव्या वर्षात पदार्पण केलं आहे.   

2/5

आज (29 जुलै 2021) रोजी त्यांचा शंभरावा वाढदिवस असल्यामुळं सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.   

3/5

बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभराव्या वाढदिवसानिमित्तानं पुण्याची भावे हायस्कूल येथे एक भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे.   

4/5

बाबासाहेब आणि त्यांचं एकंदर कार्य या रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आलं आहे. जिथं वक्ते बाबासाहेब, लेखक बाबासाहेब आणि एक व्यक्ती म्हणून बाबासाहेब नेमके कसे आहेत याचं सुरेख चित्र रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आलं आहे.   

5/5

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ही कलाकृती नागरिकांनाही पाहता येणार आहे.