Ranthambore National Park: बिबट्याची बाईकवर उडी; चित्तथरारक फोटो कॅमेऱ्यात कैद

Apr 01, 2021, 14:11 PM IST
1/6

रणथंभौरमधील घटना

रणथंभौरमधील घटना

फोटोग्राफर श्रीधर शिवाराम (Sridhar Sivaram) यांनी आपला गाइड बॉबीसोबत जंगलात फोटो काढण्यासाठी निघाले. या दरम्यान एका बिबट्याची टक्कर बाइकशी झाली. या झटापटीतील फोटो श्रीधर यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

2/6

बिबट्यावर पडली बाइक

बिबट्यावर पडली बाइक

बाइकवर तीन लोक बसले होते. अचानक रस्त्यात बिबट्या आल्याने त्यांचा बॅलेन्स बिघडला. त्यावेळी हे तिघं त्या बिबट्यावर पडले. या दरम्यान तिघांना थोडीच दुखापत झाली. पण बिबट्या तात्काळ तेथून पळून गेला. 

3/6

याच जागेवर लोकं काढत होते सेल्फी

याच जागेवर लोकं काढत होते सेल्फी

श्रीधर शिवाराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, रणथंभोर नॅशनल पार्क  (Ranthambore National Park) मध्ये जाणारी लोकं सेल्फी घेण्यात मग्न होते. याच जागेवर वाघ आणि बिबट्या असण्याची दाट शक्यता असते. 

4/6

चित्तथरारक अनुभव कॅमेऱ्यात कैद

चित्तथरारक अनुभव कॅमेऱ्यात कैद

फोटोग्राफर श्रीधर यांनी हा चित्तथरारक अनुभव आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. याचा संपूर्ण अनुभव त्यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर लिहिला आहे. 

5/6

होळीच्या एक दिवस अगोदरची घटना

होळीच्या एक दिवस अगोदरची घटना

ही घटना होळीच्या एक दिवस अगोदरची आहे. या दिवशी लोकांची गर्दी जरा जास्त होती. या घटनेने कुणालाच नुकसान झालेलं नाही. 

6/6

पार्क प्रबंधनद्वारे शटल बस

पार्क प्रबंधनद्वारे शटल बस

या घटनेनंतर मंदिर दर्शनासाठी येणाऱ्या सामान्यांना पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आलं आहे. शटल बसचा वापर केला जाणार आहे. जेणे करून पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून