Ratan Tata Birthday : जेव्हा रतन टाटांनी फोर्डच्या मालकांचा केला होता किमान शब्दात कमाल अपमान

Ratan Tata : आमच्यावर उपकार केलेत असं म्हणण्याची वेळ रतन टाटा यांनी फोर्डच्या मालकांवर आणली होती

Dec 27, 2022, 18:50 PM IST
1/7

tata ratan

आज जेष्ठ उद्योगपती रतन टाटा हे त्यांचा 85 वा वाढदिवस साजरा करत आहेत. रतन टाटा हे त्यांच्या साधेपणा आणि नम्रतेसाठी कायमच ओळखले जातात. म्हणूनच जगभरातील लोक त्यांना आदर करतात. मात्र कधीतरी रतन टाटा यांनाही अपमानाला सामोरे जावं लागलं होतं. मात्र त्यांनी या अपमानाचा बदला बोलण्यातून न घेता तर कामातून घेऊन दाखवला होता.

2/7

ratan tata

नव्वदच्या दशकात, टाटा मोटर्सने फोर्डशी आपला कार विभाग विकण्यासाठी विनंती केली होती. मात्र लक्झरी कार निर्मात्या फोर्डच्या मालकांनी रतन टाटा यांना अपमानित केले होते. मात्र रतन टाटा यांनी आपला निर्णय मागे घेतला आणि त्यानंतर फोर्डला माफी मागावी लागली होती.

3/7

tata

नव्वदच्या दशकात रतन टाटा यांनी टाटा मोटर्सच्या माध्यमातून टाटा इंडिका (tata indica) ही गाडी लॉन्च केली होती. पण ते यशस्वी ठरले नाही आणि परिस्थिती इतकी बिघडली की त्यांना आपली कार डिव्हिजन विकण्याचा निर्णय घ्यावा लागला. यासाठी टाटा यांनी फोर्ड मोटर्सचे चेअरमन बिल फोर्ड (bill ford) यांना विनंती केली होती.

4/7

ratan tata group

तुम्हाला काहीच माहिती नाही, तुम्ही प्रवासी कार बनवण्याचा विभाग का सुरू केला? जर मी हा करार केला तर तुमच्यावर खूप मोठे उपकार होतील अशा शब्दात बिल फोर्ड यांनी टाटांना अपमानीत केले होते.

5/7

tata

मात्र रतन टाटा यांनी त्यावेळी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. टाटा यांनी त्याच रात्री कंपनी न विकण्याचे ठरवले. तेव्हाच टाटा यांनी कंपनीच्या कार विभागाला उंचीवर नेण्याचे ठरवले आणि नऊ वर्षांनंतर टाटा मोटर्सने जगभरातील बाजारपेठेत वर्चस्व गाजवले.

6/7

ratan tata

टाटा मोटर्स एकीकडे उंची गाठत होती तेव्हा दुसरीकडे बिल फोर्डच्या नेतृत्वाखालील फोर्ड मोटर्सची अवस्था दयनीय झाली होती. त्यावेळी बुडणाऱ्या फोर्ड कंपनीला वाचवण्यासाठी रतन टाटा पुढे आले. रतन टाटा यांनी बिल फोर्ड यांना त्यांच्या कंपनीचे सर्वात लोकप्रिय जॅग्वार आणि लँड रोव्हर ब्रँड्स खरेदी करण्याची ऑफर दिली. हा करार करण्यासाठी बिल फोर्ड यांना मुंबईत यावे लागले.

7/7

tata ford

मुंबईत येताच फोर्ड यांनी रतन टाटा यांचे आभार मानले आणि "तुम्ही जॅग्वार आणि लँड रोव्हर  खरेदी करून आमच्यावर मोठे उपकार करत आहात," असे म्हटले.