Year Ended 2022 : तुनिषा शर्मासह या' 10 अभिनेत्रींनी 2022 मध्ये संपवलं जीवन, 9 जणी तर तिशीतल्या

Entertainment : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) शनिवारी 24 डिसेंबर रोजी मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आपलं जीवन संपवलं (Suicide) आहे. मेकअप रुममध्येच तुनिषाने गळफास घेत आत्महत्या केली. तुनिषाच्या आत्महत्येने आता एकच खळबळ उडाली आहे. तुनिषाच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. तसं 2022 मधल्या घटनांवर लक्ष टाकलं तर मनोरंजन क्षेत्रासाठी हे वर्ष भयावह ठरलं. या वर्षात अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सने मृत्यूला कवटाळलं. धक्कादायक म्हणजे यातील बहुतेक अभिनेत्री या 18 ते 30 वयोगटातल्या होत्या.

Dec 27, 2022, 18:36 PM IST
1/10

तुनिषा शर्मा

प्रेमात धोका मिळाल्याने अवघ्या 20 व्या वर्षी तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) टोकाचं पाऊल उचललं. याप्रकरणी तुनिषाचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता शीजान खानला (Sheezan Mohammed Khan) पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं. तुनिषा छोट्या पडद्यावरील 'अली बाबा : दास्तान-ए-काबुल' (ali baba dastaan-e-kabul) मालिकेत काम करत होती. मालिकेच्या सेटवर मेकअप रुममध्ये तीने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेच्या 15 दिवसांपूर्वीच तनुषा आणि शीजान खानचं ब्रेकअप झाल्याची चर्चा होती.

2/10

सरस्वती दास

बांगला फिल्म इंडस्ट्रीमधली (Bangla Film Industry) अभिनेत्री आणि मॉडेल सरस्वती दासने (Saraswati Das) 28 मे रोजी घरात सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. सरस्वती दास ही अवघ्या 18 वर्षांची होती. मीडिया रिपोर्टनुसार प्रेमप्रकरणातील तणावामुळे सरस्वती दासने हे पाऊल उचलल्याचं बोललं जातंय.

3/10

वैशाली ठक्कर

ये रिश्ता क्या कहलाता है' आणि 'ससुराल सिमर का'  या सारख्या टीव्ही मालिकेत काम करणारी अभिनेत्री वैशाली ठक्कर (Vaishali Thakkar) हिने याच वर्षी ऑक्टोबरमध्ये आत्महत्या केली. वैशालीला आत्महत्येस भाग पाडल्याचा आरोप करत तिचा एक्स बॉयफ्रेंड राहुल नवलानी याला अटक करण्यात आली. वैशालीचे खासगी फोटो लीक करण्याची वारंवार धमकी देत असल्याचा राहुलवर आरोप आहे.   

4/10

बिदिशा डे

25 मे रोजी अभिनेत्री बिदिशा डे मजूमदार (Bidisha Day Majumdar) हिचा मृतदेह तिच्याच राहत्या घरी आढळला होता. आत्महत्येपूर्वी 21 वर्षांच्या बिदिशाने सुसाईड नोट लिहिली होती. यात तीने आपल्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये असं म्हटलं होतं. प्रेमात असफल ठरल्याने तीने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

5/10

रश्मिरेखा ओझा

ओडिशा टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री रश्मीरेखाच्या (RashmiRekha) आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला होता. अवघ्या 23 वर्षांच्या रश्मीरेखाने भूवनेश्वरमधल्या आपल्या घरी गळफास घेतला. रश्मीरेखाच्या वडिलांनी तिच्या आत्महत्येला तिचा बॉयफ्रेंड संतोश पात्रा याला जबाबदार ठरवलं होतं. रश्मीरेखा संतोष पात्राबरोबर (Santosh Patra) पत्नीसारखीच राहत होती. 

6/10

पल्लवी डे

बंगला अभिनेत्री पल्लवी डेने (Pallavi Day) 15 मे रोजी आपलं जीवन संपवलं. 25 वर्षांच्या पल्लवीचा मृतदेह सिलिंग फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. कुटुंबियांनी तिच्या मृत्यूबाबत कोणावरही संशय व्यक्त केला नाही.

7/10

मंजूषा नियोगी

बंगालची आणखी एक अभिनेत्री मंजूषा नियोगी (Manjusha Niyogi) हिच्या आत्महत्येनं सर्वांनाच धक्का बसला होता. कारण मंजूषा ही बिदिशा डेची खास मैत्रिण होती. बिदिशा डेचा मृत्यूच्या दोन दिवसांनंतर मंजूषाने आत्महत्या केल्याने या प्रकरणाबाबत गुढ वाढलं आहे. 26 वर्षांच्या मंजूषाचा मृतदेह सिलिंग फॅनला लटकलेल्या अवस्थेत सापडला.   

8/10

थूरिगाई कबीलन

तामिळ फिल्म इंडस्ट्रीजमधील (Tamil Film Industry) प्रसिद्ध गीतकार कबीलन (Kabilan) यांची मुलगी थूरिगाई (Thoorigai Kabilan) हिने 9 सप्टेंबरला गळफास घेत आत्महत्या केली. कुटुंबाकडून लग्नासाठी वारंवार दबाव टाकण्यात येत असल्याने नैराश्येत 28 वर्षांच्या थूरिगाईने जीवन संपवल्याचं बोललं जात आहे. ज्याच्यावर थूरिगाई प्रेम करत होती, त्याच्याबरोबर लग्न करण्याला तिच्या घरच्यांचा विरोध होता.

9/10

पॉलिन जेसिका

दक्षिणेतील अभिनेत्री पॉलिन जेसिका (Pauline Jessica) हिने 17 सप्टेंबर 2022 मध्ये चेन्नईतल्या विरुगमबक्कम परिसरातील आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. पॉलिन अवघ्या 29 वर्षांची होती. ती दीपा नावानेही प्रसिद्ध होती. दीपाने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

10/10

प्रत्यूषा गरिमेला

प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्यूषा गरिमेला (Pratyusha Garimella) हिने 35 व्या वर्षी मृत्यूला कवटाळलं. प्रत्यूषाचा मृतदेह तिच्या घरातल्या बाथरुममध्ये सापडला होता. प्रत्यूषाने कार्बन मोनोक्साईड गॅसचा चेंबर करत आत्महत्या केली. एकटेपण आणि नैराश्यामुळे प्रत्यूषाने आत्महत्या केली.