...म्हणून 'या' राज्याच्या नावावरुन रतन टाटा यांनी ठेवलं त्यांच्या कुत्र्याचं नाव

Nov 20, 2020, 08:45 AM IST
1/6

...म्हणून 'या' राज्याच्या नावावरुन रतन टाटा यांनी ठेवलं त्यांच्या कुत्र्याचं नाव

विश्वविख्यात उद्योगपती रतन टाटा Ratan Tata यांना मुक्या प्राण्यांशी विशेष आवड. प्राणीमात्रांवर प्रेम करणारे टाटा हे कायमच सोशल मीडियावर यासंदर्भातील काही फोटो पोस्ट करत असतात. मुळात त्यांना रस्त्यावरील कुत्रेही तितकेच प्रिय आहेत. कुत्र्यांप्रती असणारं त्यांचं प्रेम इतकं आहे की, टाटा समूहाचं वैश्विक मुख्यालय म्हणजेच बॉम्बे हाऊसचा काही भाग त्यांनी या कुत्र्यांसाठीच राखीव ठेवला आहे. 

2/6

...म्हणून 'या' राज्याच्या नावावरुन रतन टाटा यांनी ठेवलं त्यांच्या कुत्र्याचं नाव

रतन टाटा यांना कुत्रे सर्वाधिक प्रिय. त्यांच्या सर्वात आवडत्या कुत्र्याचं नाव आहे गोवा. ऑफिसमध्ये कुत्र्याला भेटण्यासाठी ते कायमच उत्सुक असतात. दिवाळीच्या निमित्तानं टाटा यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. जिथं ते गोवा आणि इतर काही कुत्र्यांसमवेत दिसत आहेत. 

3/6

...म्हणून 'या' राज्याच्या नावावरुन रतन टाटा यांनी ठेवलं त्यांच्या कुत्र्याचं नाव

गोवासोबतचा फोटो पोस्ट केल्यानंतर एका फॉलोअरनं टाटा यांना या कुत्र्याचं नाव गोवा का ठेवलं, असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देत त्यांनी लिहिलं, ते एक लहानसं पिल्लू होतं, ज्यावेळी ते गोव्यात माझ्या सहकाऱ्यांच्या कारमध्ये येऊन बसलं. त्यानंतर तो थेट आमच्यासह बॉम्बे हाऊसमध्ये आला. त्याला गोव्याहून आणलं होतं म्हणून त्याचं नाव गोवा. 

4/6

...म्हणून 'या' राज्याच्या नावावरुन रतन टाटा यांनी ठेवलं त्यांच्या कुत्र्याचं नाव

इन्स्टाग्रामच्या विश्वात रतन टाटा मागील काही महिन्यांपासून अगदी सराईताप्रमाणं वावरत आहेत. 

5/6

...म्हणून 'या' राज्याच्या नावावरुन रतन टाटा यांनी ठेवलं त्यांच्या कुत्र्याचं नाव

टाटा यांचे इन्स्टाग्रामवर तब्बल 30 लाख फॉलोअर्स आहेत. पण, खुद्द रतन टाटा मात्र टाटा ट्रस्ट नामक अकाऊंटलाच फॉलो करत आहेत. 

6/6

(सर्व छायाचित्रे- इन्स्टाग्राम/ रतन टाटा)