ज्येष्ठ लेखक, नाटककार रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

| May 18, 2020, 09:23 AM IST
1/18

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

ज्येष्ठ लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी यांच निधन झालं आहे. त्यांच्या जाण्यामुळे रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. रत्नाकर मतकरी यांच वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं.

2/18

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

रविवार दिनांक १७ मे रोजी रात्री साडे अकराच्या सुमाराला ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, रंगकर्मी , आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे देहावसान झाले. गेले काही दिवस त्यांना थोडा थकवा जाणवत होता.

3/18

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

चार दिवसांपूर्वी गोदरेज इस्पितळात चेक अपसाठी ॲडमिट झाले असताना त्यांची कोविड टेस्ट करण्यात आली, जी पाॅझिटीव असल्याचे लक्षात आले. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना सेवन हिल्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथेच त्यांचे देहावसान झाले. मृत्यूसमयी ते एक्याऐशी वर्षांचे होते. 

4/18

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

मृत्यूसमयी ते एक्याऐशी वर्षांचे होते. १९५५ मधे, वयाच्या सतराव्या वर्षी, त्यांची ‘वेडी माणसं’ ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन प्रकाशित झाली

5/18

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे लेखन अव्याहतपणे चालू होते. मतकरींची ‘लोककथा ७८’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा ‘, आणि इतर अनेक नाटके नाट्य रसिकांच्या मनात कायम घर करुन आहेत.

6/18

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

अलीकडेच ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ या मुलांच्या, तसच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारीत ‘आरण्यक’ या नाटकांनी रंगभूमी गाजवून सोडली.

7/18

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

वास्तवाचे भान देणाऱ्या गूढकथा हा कथाप्रकार त्यांनी एकहाती वाचकांपर्यंत पोचवला

8/18

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

मोठ्यांसाठी सत्तर तर मुलांसाठी बावीस नाटकं, अनेक एकांकिका, वीस कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेख संग्रह, आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’  अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे. 

9/18

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

‘गहीरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिका, तसच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्वेस्टमेन्ट’, अशी त्यांची इतर माध्यमामधली कामंही रसिकप्रिय ठरली आहेत.  

10/18

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

रत्नाकर मतकरींना विपुल पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत. संगीत नाटक अकादेमी आणि साहित्य ॲकेडमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून  पुरस्कारप्राप्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तीमत्वात त्यांचा समावेश होतो.

11/18

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

रत्नाकर मतकरींच्या पश्चात निर्मिती आणि अभिनयाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी,  कन्या अभिनेत्री सुप्रिया विनोद, पुत्र लेखक/समीक्षक गणेश मतकरी, जावई डाॅ. मिलिंद विनोद, स्नुशा आर्किटेक्ट पल्लवी मतकरी आणि नातवंडे, असा परिवार आहे.

12/18

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

मतकरींच्या जाण्याने साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात एक न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

13/18

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

रत्नाकर मतकरींचे काही निवडक फोटो 

14/18

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

त्यांचा जीवनप्रवास फोटोंच्या माध्यमातून 

15/18

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत रत्नाकर मतकरींच निधन झालं.   

16/18

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

मराठी साहित्य क्षेत्रातून, सिनेसृष्टीतून रत्नाकर मतकरींना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

17/18

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

रत्नाकर मतकरींच्या निधनाच्या बातमीमुळे सगळ्यांना धक्का बसला. 

18/18

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

रत्नाकरी मतकरींचा जीवनप्रवास

अनेक कलाकारांनी आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या.  (सर्व फोटो सौजन्य - रत्नाकर मतकरी यांचे फेसबुक पेज)