मुंबईत आला तेव्हा ना घर, पोट भरण्यासाठी ना पैसे; आज आहे 12 पास अभिनेता 20 कोटींचा मालक
Ravi Kishan Birthday : आज आम्ही अशा अभिनेत्याबद्दल बोलतोय जो एकेकाळी काम मिळवण्यासाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. अभिनेता बनायच म्हणून वडिलांकडून मार खाला आणि मुंबईला पळून आला. ना घर, पोट भरण्यासाठी ना पैसे चाळीत 12 लोकांसोबत एकाच खोलीत राहायचा.
1/7
हा चिमुकला प्रसिद्ध अभिनेता आणि राजकारणी आहे. आज त्याचा 55 वाढदिवस साजरा करतोय. आम्ही बोलतोय भोजपुरी अभिनेता आणि लापता लेडीजमधील पोलिसाची भूमिका साकारणारा रवि किशन यांच्याबद्दल. आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्याने केवळ चित्रपटसृष्टीतच नाही तर राजकारणातही आपली वेगळी ओळख निर्माण केलीय.
2/7
रवि किशन यांचं पूर्ण नाव रवी किशन शुक्ला असून त्यांनी केवळ 12वीपर्यंतच शिक्षण घेतलंय. वडिलांना त्यांनी सांगितलं की, अभिनेता बनायचे आहे तर त्यांनी मारहाण केली. त्यानंतर रवि किशन मुंबईत पळून आले. इथे मुंबईतील चाळीत 12 जणांसोबत तो एका खोलीत राहत होता. 1992 मध्ये आलेल्या 'पिताबर' या चित्रपटातून अभिनय करिअरला सुरुवात केली. पण 2003 मध्ये रिलीज झालेल्या सलमान खान स्टारर 'तेरे नाम' या चित्रपटातून त्याला इंडस्ट्रीत ओळख मिळाली.
3/7
4/7
5/7
6/7