Bday Special: ठरलेलं लग्न मोडलं... रवि शास्त्री आणि अमृता सिंह यांची अधुरी प्रेम कहाणी

बॉलिवूड आणि क्रिकेट यांचं नातं फार जुनं आहे. अनेक बॉलिवूड-हॉलिवूड स्टार्स भारतीय क्रिकेटपटूंवर फिदा असल्याचे किस्से देखील आहेत. असाच एक चर्चेचा विषय ठरलेल्या टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि सध्याचे टीम इंडियाचे कोच रवि शास्त्री यांचा आहे. आज रवि शास्त्री यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं जाणून घेऊया त्यांच्याविषयीच्या खास गोष्टी

May 27, 2021, 13:28 PM IST
1/5

अमृता सिंहच्या प्रेमात होते रवि शास्त्री

अमृता सिंहच्या प्रेमात होते रवि शास्त्री

अभिनेत्री अमृता सिंह आणि रवि शास्त्री एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा त्याकाळी होत्या. दोघंही एकमेकांच्या बाबतीत खूप जास्त सीरियस होते. दोघंही लग्न करणार होते. अनेक पार्टीमध्ये, क्रिकेटच्या स्टेडियममध्ये देखील अमृता सिंह दिसल्या होत्या. 

2/5

अमृता-रवि शास्त्री यांचा साखरपुडा

अमृता-रवि शास्त्री यांचा साखरपुडा

अमृता आणि रवि शास्त्री यांचा फोटो एका प्रसिद्ध मासिकाच्या कव्हरपेजवर देखील आला होता. त्या फोटोग्राफनंतर दोघांनीही ऑफिशियली रिलेशनमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं. 1986 मध्ये रवि शास्त्री आणि अमृता सिंह यांनी साखरपुडा देखील केला. 

3/5

ठरलेलं लग्न मोडलं

ठरलेलं लग्न मोडलं

साखरपुडा झाल्यानंतर जास्त काळ दोघांचं रिलेशन टिकलं नाही. त्या दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. ठरलेलं लग्न मोडलं त्यावेळी रवि शास्त्री यांनी म्हटलं होतं की 'मला बायको म्हणून एक अभिनेत्री नको होती. तिने घराकडे लक्ष देणं ही प्राथमिक गोष्ट महत्त्वाची' असल्याचंही त्यावेळी वृत्तांमधून समोर आलं होतं.   

4/5

1990 सालात रितू सिंह यांच्याशी बांधली लग्नगाठ

1990 सालात रितू सिंह यांच्याशी बांधली लग्नगाठ

अमृता सिंह यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर 1990मध्ये रितु सिंह यांच्यासोबत विवाह केला. त्यानंतर 1991 मध्ये अमृता सिंहने बॉलिवूडचे छोटे नवाब म्हणून ओळखले जाणाऱ्या सैफ अली खानसोबत विवाह केला होता.   

5/5

या अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं नाव

या अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं नाव

लग्नानंतरही रवि शास्त्री यांचं नाव डिंपल कपाडिया आणि निमरत कौर यांच्यासोबत देखील जोडलं गेलं होतं. त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चाही रंगली होती. मात्र रवि शास्त्री किंवा डिंपल असो निमरत यांनी मौन बाळगणं पसंत केलं होतं.