तुमच्या खिशातील 10 रुपयांचं नाणं खरं की खोटं? त्यावर किती रेषा? जाणून घ्या RBI चे निर्देश

| Sep 08, 2024, 08:26 AM IST
1/9

तुमच्या खिशातील 10 रुपयांचं नाणं खरं की खोटं? त्यावर किती रेषा? जाणून घ्या RBI चे निर्देश

RBI guideline 10 Rupess Coin Real or Fake Marathi News

10 Rupee Coin: 10 रुपयांच्या नाण्याबाबत लोकांमध्ये अनेकदा संभ्रम असतो. सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) वेळोवेळी याबाबत अलर्ट जारी करत आहेत. असे असले तरी या गोंधळामुळे आजही बाजारात अनेक ठिकाणी दुकानदार 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार देत आहेत.   

2/9

कोणती नाणी खरी?

RBI guideline 10 Rupess Coin Real or Fake Marathi News

आतापर्यंत 14 डिझाईन्सची (विविध प्रकारची) 10 रुपयांची नाणी बाजारात आली आहेत. सर्व नाणी चलनात आहेत. दरम्यान यातील कोणती खरी? कोणती खोटी? यावर नेहमीच वाद होत असतो.

3/9

10 रेषांचे नाणे खरे आहे का?

RBI guideline 10 Rupess Coin Real or Fake Marathi News

10 रुपयांच्या नाण्यावर 10 ओळी छापलेले नाणेच खरे आहे, असे काहींना वाटते. तर 15 ओळी असलेले नाणे बनावट असल्याचा दावा केला जातो. पण खुद्द रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) यामागचे सत्य सांगितले आहे.

4/9

सर्व व्यवहारात वापर?

RBI guideline 10 Rupess Coin Real or Fake Marathi News

RBI दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या अधिकाराखाली तयार केलेली आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेली विविध आकारांची आणि डिझाइनची ₹10 नाणी ही कायदेशीर निविदा आहेत. कायदेशीर निविदा म्हणून ते सर्व व्यवहारांमध्ये वापरले जाऊ शकतात.

5/9

वेगवेगळ्या रचनेमुळे निर्माण होतो संभ्रम

RBI guideline 10 Rupess Coin Real or Fake Marathi News

नाणी बनवण्याचे काम भारत सरकारच्या टांकसाळीत केले जाते आणि सर्व नाण्यांवर वेळोवेळी आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्ये चित्रित केली जातात. खरं तर, लोकांमध्ये भिन्न धारणा आहेत, ज्यामुळे लोक 10 रुपयांची नाणी घेण्यास टाळाटाळ करतात. काहींच्या मते ₹ चिन्ह असलेले नाणेच फक्त अस्सल आहे तर काहींच्या मते फक्त 10 ओळी असलेले नाणेच फक्त अस्सल आहे.

6/9

14 प्रकारच्या डिझाइन्सचा उल्लेख

RBI guideline 10 Rupess Coin Real or Fake Marathi News

आरबीआयने याबाबत अनेकदा संभ्रम दूर केला आहे. सेंट्रल बँकेने आपल्या वेबसाइटवर यासाठी एक नोट पोस्ट केली आहे, ज्यामध्ये 14 प्रकारच्या डिझाइन्सचा उल्लेख आहे. त्याच वेळी, एक IVRS टोल फ्री नंबर देखील आहे, ज्यामध्ये 10 रुपयांच्या नाण्याशी संबंधित माहिती दिली आहे. 

7/9

आरबीआयकडून आले स्पष्टीकरण

RBI guideline 10 Rupess Coin Real or Fake Marathi News

आरबीआयचे म्हणणे आहे की सर्व प्रकारची नाणी चांगली आहेत आणि लोकांनी ती स्वीकारण्यास नकार देऊ नये. 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार दिल्याने कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते.

8/9

टोल फ्री क्रमांक

RBI guideline 10 Rupess Coin Real or Fake Marathi News

चलनात असलेल्या नाण्यांची सत्यता पडताळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने 14440 हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. यावर कॉल करताच फोन डिस्कनेक्ट होईल. त्यानंतर या नंबरवरून लगेच एक कॉल येईल, ज्यामध्ये IVR द्वारे 10 रुपयांच्या नाण्यांबद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल.

9/9

शंकाचे निरसन करा

RBI guideline 10 Rupess Coin Real or Fake Marathi News

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, देशात 10 रुपयांची 14 प्रकारची नाणी प्रचलित आहेत. ती स्वीकारणे प्रत्येकावर बंधनकारक आहे. यासंदर्भात काही शंका असल्यास टोल फ्री नंबर डायल करून शंकेचे निरसन करु शकता, असे आवाहन आरबीआयने केले आहे.